Advertisement

गेट वे ऑफ इंडियाजवळ महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी भेट देणाऱ्या महिला पर्यटकांसाठी शौचालयाची कमतरता असल्याने अनेकदा त्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी गेट वे परिसरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात आलं आहे. नुकतंच या स्वच्छतागृहच उद्घाटन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.

गेट वे ऑफ इंडियाजवळ महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
SHARES

गेट वे ऑफ इंडिया परिसरात फक्त मुंबईतले किंवा राज्यभरातलेच नव्हे तर देश-विदेशातूनही पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देत असतात. परंतु, या ठिकाणी भेट देणाऱ्या महिला पर्यटकांसाठी शौचालयाची कमतरता असल्याने अनेकदा त्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी गेट वे परिसरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात आलं आहे. नुकतंच या स्वच्छतागृहच उद्घाटन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.


अतिशय स्वच्छ, सुंदर आणि अत्याधुनिक यंत्रणासह विनामूल्य असं हे स्वच्छतागृह खास महिलांसाठी उभारण्यात आलं आहे.
राऊंड टेबल इंडिया आणि लेडीज सर्कल इंडिया यांच्या भागीदारीने सामाटेक फाऊंडेशनने उभारलेल्या या स्वच्छतागृहामुळे महिलावर्गाला दिलासा मिळणार आहे.


सध्या परिस्थिती काय?

गेट वे ऑफ इंडिया या परिसरात फक्त एकच सुलभ शौचालय आहे. त्यात महिलांसाठी ३ टॉयलेट सीट असून पुरूषांसाठी फक्त २ टॉयलेट सीट आहेत. त्यामुळं सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार आणि रविवारी या सुलभ शौचालयासमोर बऱ्याच पर्यटकांची गर्दी होते. या गर्दीमुळे अनेकदा काही पर्यटक, लहान मुलं, टॅक्सीचालक, खासगी ड्रायव्हर उघड्यावर टॉयलेटला जातात.


आणि ई-टॉयलेट सुरू

एकंदरच या परिसरात दुर्गंधीचं वातावरण आणि अस्वच्छता पसरते. यामुळे या परिसरात शौचालयाची संख्या वाढवण्याची मागणी अनेक पर्यटकांनी केली होती. त्याशिवाय पालिकेनं केलेल्या एका सर्व्हेक्षणात सहा लाखांहून अधिक (८३ टक्के) लोकांनी अस्वच्छ म्हणून मत दिलं होतं. त्यानुसार काही दिवसांपूर्वी ई-टॉयलेट सुरू करण्यात आलं होतं.


या सुविधा उपलब्ध

गेटवे ऑफ इंडिया परिसरात खास महिलांसाठी मुंबई महापालिकेच्या स्टोअर रूमच्या जागेवर हे स्वच्छतागृह बनवण्यात आलं आहे. या स्वच्छतागृहात दहा शौचकूप, कपडे बदलण्याचा कक्ष, स्तनपान कक्ष असणार आहे. त्याशिवाय या स्वच्छतागृहात दिव्यांगासाठी विशेष शौचकूपची सुविधा देण्यात आली आहे.


विशेष म्हणजे या स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनेरेटर, पाण्याचा कूलर आणि एक प्रतिक्षालय अशा सुविधा देण्यात आल्या आहे.

या स्वच्छतागृहात महिलांसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन, लहान बाळासाठी स्तनपान कक्ष, कपडे बदलण्यासाठी कक्ष, उभारण्यात आलं आहे. यामुळे या ठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या महिला पर्यटकांची यापुढे गैरसोय होणार नाही.
- किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ए विभाग


महिलांसाठी या स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान आहे. याआधी बाणगंगा, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राइव्ह या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

- कीथ मास्करेन्हास, अध्यक्ष, सामाटेक फाऊंडेशन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा