Advertisement

पंकजा मुंडेंनी थकवला महापालिकेचा कर


पंकजा मुंडेंनी थकवला महापालिकेचा कर
SHARES

वरळी येथील शुभदा को-ऑप हाउसिंग सोसाइटीत अनेक बड्या नेत्यांचे आणि नौकरदार वर्गाचे अपार्टमेंट आणि दुकानं आहेत. मात्र त्यांच्याकडे पालिकेच्या कराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे. 

या इमारतीत पंकजा मुंडे यांची एनव्ही डिस्टिलरीज लिमिटेड, शेतकरी बळीराजा साखर कारखाना लिमिटेड आणि येथील शॉप नं 15 ही तीन दुकानं आहेत. या दुकानांचा 1,46,31,175 कोटी रुपयांचा संपत्ती कर त्यांनी थकवला आहे.


यांनीही थकवला कर

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी देखील 2 कोटी 90 लाख 144 रुपयांचा कर भरला नाही. यांच्यासह माजी मंत्री अण्णा डांगे यांनीही 49 लाख 31 हजार 654 रुपयांचा कर भरला नव्हता. यांशिवाय आमदार गोपालदास अग्रवाल यांचा मुलगा प्रफुल अग्रवाल यांनी देखील 1687,689 लाख रुपयांचा कर भरला नाही. मागील एक वर्षांपासूनचा हा कर भरणा त्यांनी अजूनही भरलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीत अनेक नेतेमंडळी आणि मंत्र्यांसह नौकरदार वर्गाचे फ्लॅट आहेत. ज्यांनी कोट्यवधींचा कर भरलेला नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा