Advertisement

वाळूशिल्पातून बाळासाहेबांना श्रद्धांजली


वाळूशिल्पातून बाळासाहेबांना श्रद्धांजली
SHARES

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त लक्ष्मी गौड- कांबळे या महिला कलाकाराने शिवाजी पार्कवर वाळूचं शिल्प साकारून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लक्ष्मी यांनी हे शिल्प गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेपासून शुक्रवारी सकाळी १० वाजेदरम्यान पूर्ण केलं.  


जनजागृतीचं माध्यम

लक्ष्मी नेहमीच जुहू चौपाटी येथे विविध विषयांवर आधारीत वाळू शिल्प साकारून जनजागृती करत असतात. शिवाजी पार्क येथे शिल्प साकारण्यासाठी शिवसेनेचे अरविंद भोसले आणि यशवंत जाधव यांनी आपल्याला सहकार्य केल्याचं लक्ष्मी यांनी सांगितलं. लक्ष्मी दरवर्षी महापरिनिर्वाण दिनाला जुहू चौपाटीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचंही वाळूशिल्प साकारतात.



'श्रद्धांजलीचा छोटासा प्रयत्न'

बाळासाहेब हयात असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मी एकदा जुहू चौपाटीवर त्यांचं शिल्प साकारलं होतं. याची माहिती होताच बाळासाहेबांनी मला भेटायला बोलावलं होतं. पण त्यांची प्रकृती ठिक नसल्याने भेट होऊ शकली नाही. ही खंत माझ्या मनात कायम राहील. त्यामुळे बाळासाहेबांच्या ५ व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कवर वाळूचं शिल्प साकारण्याची माझी तीव्र इच्छा होती, ही माझी इच्छा पूर्ण झाली आहे. मी कोणत्याही कला महाविद्यालयात शिक्षण घेतलेलं नाही. माझे वडील प्रसिद्ध कलाकार मारुती कांबळे यांच्या प्रेरणेतून मला ही कला अवगत झाली.

- लक्ष्मी गौड-कांबळे, वाळूशिल्प कलाकार



हेही वाचा - 

बाळासाहेबांचा 5 वा स्मृतिदिन, शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा