याचिकाकर्त्याने मागणीचे समर्थन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन आरोग्य संघटनेच्या 25 जून 2024 च्या अहवालाचाही याचिकेत संदर्भ दिला आहे.

त्यात, मद्यप्राशनामुळे 30 लाखांहून अधिक मृत्यूंची नोंद झाल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप आवश्यक असल्याचे अधोरेखीत करण्यात आले होते.

याशिवाय, जागितक आरोग्य संघटनेने मद्याला वर्ग १ कर्करोगकारक म्हणून घोषित केले आहे, असे असतानाही मद्याच्या बाटल्यांवर ही महत्त्वाची वस्तुस्थिती नमूद करण्यात येत नाही, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, अमेरिकेतील वैद्यकीय तज्ज्ञांनी मद्य हे किमान सात प्रकारच्या कर्करोगांचे मूळ असल्याचे आणि याचा विचार करता कर्करोगाची जोखीम दर्शवणारे लेबल मद्याच्या बाटल्यांवर लावणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.



हेही वाचा

ठाण्यात 711 कुष्टरोगी बाधितांची नोंद

राणीच्या बागेतील मत्सालयाचा प्रकल्प वादात