Advertisement

शनिवार 22 जुलै रोजी मुंबईत यलो अलर्ट

शनिवारी शहरात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे

शनिवार 22 जुलै रोजी मुंबईत यलो अलर्ट
SHARES

22 जुलै रोजी मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे संकेत आहेत. 24 जुलै आणि 25 जुलै रोजी मुंबईला 'ग्रीन' अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. IMD च्या अंदाजानुसार, ठाणे, रायगड, मुंबई जिल्हे आणि पुण्यातील घाट भागात काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या बेस वेदर स्टेशन सांताक्रूझ येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत केवळ २९ मिमी पाऊस झाला असला तरी, सकाळ आणि दुपारच्या सुमारास संपूर्ण शहरात पावसाचा जोर वाढला.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी सकाळपासूनच सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांत पाणी साचलं. महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई IMD ने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुणे, पालघर, रायगड आणि सातारा या ४ जिल्ह्यांना आज २४ तासांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून आज रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या चार जिल्ह्यांनाही आज ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हेही वाचा

पावसाबद्दल महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

घाटकोपर भूस्खलनानंतर 100 हून अधिक लोकांचे स्थलांतर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा