
गेल्या 24 तासांत मुंबईत (mumbai) कमाल तापमानात (temperature) तीन अंशाने वाढ झाली आहे.
वाढत्या आर्द्रतेमुळे होणारा त्रास लक्षात घेता, भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई आणि महानगर क्षेत्रासाठी पुढील दोन दिवसांसाठी 'उष्ण आणि दमट' हवामानाचा 'यलो अलर्ट' (Yellow alert) जारी केला आहे.
हा इशारा शुक्रवार, 17 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंत लागू राहील.
मंगळवारी सांताक्रूझ वेधशाळेत 36°C कमाल तापमानाची नोंद झाली, जे सरासरीपेक्षा जास्त होते. मुंबईतील सर्वाधिक तापमान नोंदवलेली प्रमुख ठिकाणे अशी होती -
राम मंदिर (ओशिवरा): 38.2
विक्रोळी: 37.2
विद्याविहार: 36.2
चेंबूर व वांद्रे: 35.8
दहिसर: 35.1
मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा असतानाच, महाराष्ट्राच्या (maharashtra) अंतर्गत भागात, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ विभागात 'उष्णतेच्या लाटेचा' इशारा देण्यात आला आहे.
या भागात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा
