Advertisement

बेस्ट बस थांब्यासमोर थांबविण्यासाठी पिवळा स्टॉपर बॉक्स


बेस्ट बस थांब्यासमोर थांबविण्यासाठी पिवळा स्टॉपर बॉक्स
SHARES

बेस्टच्या प्रवासादरम्यान अनेकदा बसचालक बसगाडी थांब्याच्या पुढे थांबवताना पाहायला मिळतं. त्यामुळं प्रवाशांनाही त्याठिकाणी जाऊन बसमध्ये चढावं लागतं असून त्यामुळं प्रवाशांची मोठी गैर सोय होते. मात्र, आता यामधून प्रवाशांची सुटका होणार आहे. कारण बेस्ट प्रशासन लवकरच बस थांब्यांवर पिवळ्या रंगाचे स्टॉपर बॉक्स बसवणार आहे.

नोटीस जारी

याबाबत शिवसेनेचे नगरसेवक वसंत नाकसे यांनी प्रस्ताव तयार केला असून, महापालिकेनं सोमवारी या प्रस्तावाबाबत एक नोटीस जारी केली. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यावर तातडीनं निविदा काढण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करणार असून ठेकेदाराच्या कामालाही सुरूवात करण्यात येणार आहे.   

६ हजार बस थांबे

मुंबईतील ६ हजार बस थांब्यावर हे पिवळे स्टॉपर बॉक्स बसविण्यात येणार आहेत. यासाठी सध्या २० टक्के प्रमुख बस थांबे निश्चिंत करण्यात आले आहेत. याबाबत बेस्टच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, यामुळं बस चालकाला बस थांब्याच्या समोर थांबविण्यास मदत होणार आहे. 



हेही वाचा -

मुंबईतील ट्रॅफिक सिग्नल आणखी होणार स्मार्ट

बेस्टच्या संपाबाबत २३ ऑगस्टला मतदान



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा