Advertisement

बेस्टच्या संपाबाबत २३ ऑगस्टला मतदान

कोणताही तोडगा न निघाल्यामुळं २३ ऑगस्ट रोजी कामगारांचे मतदान घेऊन संपाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

बेस्टच्या संपाबाबत २३ ऑगस्टला मतदान
SHARES

बेस्ट कामगारांच्या वेतन कराराबाबत बेस्ट प्रशासन आणि मान्यताप्राप्त संघटना यांच्यात सुरू असलेल्या असलेल्या बैठकीतून कोणताही तोडगा निघालेला नाही. मंगळवारी संध्याकाळी झालेल्या बेस्ट कामगारांच्या मेळाव्यात बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं प्रशासनाबरोबरील बैठकीची माहिती दिली. त्यावेळी कोणताही तोडगा न निघाल्यामुळं २३ ऑगस्ट रोजी कामगारांचे मतदान घेऊन संपाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी मंगळवारी कामगार मेळाव्यात जाहीर केलं. त्यामुळं मतदानात संपाच्या बाजूनं कौल आल्यास मुंबईकरांना शुक्रवारनंतर बेस्टच्या संपास सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

संपाचा इशारा 

बेस्ट कामगारांच्या वेतनकरारास जोडून काही मागण्या प्रलंबित आहे. त्यावरून बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती आणि बेस्ट प्रशासनामध्ये चर्चा सुरू आहे. ५ बैठकांनंतरही तोडगा निघत नसल्यास किती दिवस गप्प बसायचे, अशी प्रतिक्रिया कृती समितीच्या वतीनं शशांक राव यांनी व्यक्त केली. सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी बेस्ट वर्कर्स युनियननं ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिला होता. मात्र, बेस्ट प्रशासनाबरोबर सकारात्मक चर्चा सुरू असल्याने, संप २० आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. या कालावधीत बेस्ट प्रशासनाकडून कामगारांच्या वेतन कराराबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं शशांक राव यांनी म्हटलं.

सामंजस्य करारावर सह्या

बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांनी जून महिन्यात सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत. मात्र, त्यानंतर एक महिना उलटला, तरी प्रशासन चर्चेला बोलवित नसल्याने संतप्त झालेल्या बेस्ट वर्कर्स युनियनने ६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली होती. मात्र, अद्याप कोणताच प्रस्ताव बेस्ट प्रशासनाकडून न आल्यामुळे संपाशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं जात आहे. 

संप पुढे ढकलला

दरम्यान, सध्यस्थितीत संप पुढे ढकलण्यात आला आहे. २३ ऑगस्टला कामगारांचं मतदान घेण्यात येणार आहे. त्यावेळी मतदानाचा कौल संपाच्या बाजून आल्यास संपावर जायचं की नाही यावर निर्णय घेण्यात येणार आहे.  हेही वाचा -

'ईडी'च्या कार्यालयावर येऊ नका, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना सूचनाRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा