Advertisement

जाणून घ्या संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी

२६ नोव्हेंबर १९४९ साली देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या दिवशी जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी

जाणून घ्या संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी
SHARES

देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ साली देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या दिवशी जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी

) भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली

) आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या आणि संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम, सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

) संविधान लिहण्यासाठी एकूण २५४ पेनच्या निबचा उपयोग करण्यात आला होता. यासाठी ६ महिने लागले होते. याचा एकूण खर्च ६.३ करोड रुपये झाला होता.

) जगातील सर्वात मोठं संविधान म्हणून भारतीय संविधान ओळखलं जातं. यात २५ भाग, ४४८ आर्टिकल आणि १२ शेड्युल आहेत. याच्या इंग्रजी भाषांतरात एकूण १ लाख १७ हजार ३६९ शब्द आहेत.

) संविधानाची इंग्रजी आणि हिंदी अनुवादित मूळ प्रत संसदेच्या लायब्ररीत ठेवण्यात आली आहे.

) संविधान सभेत एकूण ३८९ लोक होते. ज्यात २९२ ब्रिटीश प्रांताचे प्रतिनिधी, चार चीफ कमिशनर आणि ९३ राजांचा प्रतिनिधींचा समावेश होता. अंतिम समितीमध्ये २९९ लोकं होती. हैद्राबादचा राजाचे प्रतिनिधी या सभेत आलेच नाहीत.

) भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ लाच तयार झाले होते. पण आपण ते अधिकृतरीत्या ते २६ जानेवारी १९५०  यादिवशी स्वीकारली.

) अंतिम संविधान तयार होण्याआधी २ हजार पेक्षा अधिक बदल झाले.

) भारतीय संविधानावर एकूण २८४ लोकांनी सह्या केल्या. यामध्ये १५ स्त्रियांचा समावेश होता.

१०) भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवाद हा शब्द १९७३ मध्ये ४२ वा बदल करताना टाकण्यात आला आहे

 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा