Advertisement

'त्या' बाइकसाठी कलानगर इथंही स्थानक

प्रवाशांना कार्यालयात वेळेत पोहचण्यासाठी व आरामदायी प्रवासासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली.

'त्या' बाइकसाठी कलानगर इथंही स्थानक
SHARES

मागील काही दिवसांपूर्वी वांद्रे-कुर्ला संकुल इथं युलु ई-बाइकसाठी सुरू करण्यात आली होती. प्रवाशांना कार्यालयात वेळेत पोहचण्यासाठी व आरामदायी प्रवासासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली. या सुरू करण्यात आलेल्या युलु ई-बाइकसाठी नुकतेच कलानगर इथं ही स्थानक सुरू करण्यात आलं आहे. प्रवाशांच्या मागणीस प्रतिसादानुसार हे स्थानक सुरू केले असून, दिवसाला दोनशेच्या आसपास प्रवासी युलु ई-बाइकचा वापर करत आहेत.

ऑगस्टच्या अखेरीस वांद्रे-कुर्ला संकुलात युलु ई-बाइक शेअरिंगची सुविधेची सुरुवात झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि युलु बाइक यांच्या संयुक्त माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात आली. ई-बाइक शेअरिंगची सुविधा मुंबईत प्रथमच उपलब्ध झाली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात युलु ई-बाइकसाठी १० स्थानके तयार केली आहेत. वांद्रे पूर्व स्थानकाबाहेर देखील ही सुविधा आहे. मात्र सध्या रेल्वे प्रवाशांची संख्या मर्यादित असून, अनेक प्रवाशांनी कलानगर येथे स्थानक करण्याची मागणी केल्याने हे स्थानक ३ दिवसांपूर्वी सुरू केल्याची माहिती मिळते.

पश्चिम द्रुतगती मार्गावरून बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे स्थानक उपयोगी ठरतं. सध्या सर्वच कार्यालयात मर्यादित कर्मचारी संख्या तसेच करोनाच्या प्रसाराबाबत मनात असलेली भीती यामुळे युलु ई-बाइकला प्रतिसाद मर्यादित असला तरी दिवसातून २०० ते ३०० प्रवासी याचा वापर करत असल्याची माहिती मिळते. पुढील टप्प्यात १८ स्थानकांवर पाचशे ई-बाइक उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा