माटुंग्याच्या आठवडी बाजारात पारंपरिक खाद्य पदार्थांची मेजवानी

माटुंग्याच्या आठवडी बाजारात पारंपरिक खाद्य पदार्थांची मेजवानी
माटुंग्याच्या आठवडी बाजारात पारंपरिक खाद्य पदार्थांची मेजवानी
See all
मुंबई  -  

आठवडी बाजार म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी येतात त्या ताज्याताज्या भाज्या. पण याच आठवडी बाजारात जर गरमा-गरम उकडीचे मोदक, दडपे पोहे, थंड सोलकढी, साजूक तुपाचे लाडू हे सर्व खमंग पदार्थ खायला मिळाले तर? विश्वास बसत नाही ना? पण माटुंग्यात भरलेल्या आठवडी बाजारात आता भाज्या खरेदी करताना तुम्हाला पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. हा आठवडी बाजार गेल्या 5 महिन्यांपासून दर मंगळवारी भरवला जातो. 

या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह इतर दूर ठिकाणाहूनही नागरिक खरेदीसाठी या आठवडी बाजारात येतात. त्यामुळे या आठवडी बाजारात फळभाज्यांसह घरगुती पारंपरिक चविष्ट पदार्थ खायला ठेवण्यात आले आहेत. या पदार्थांना ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे.

या आठवडी बाजारात भाज्यांसह लज्जतदार पारंपरिक खाद्यपदार्थ देखील स्वस्त दरात उपलब्ध असल्याने इथे आलेले ग्राहक खूश होऊनच परतत आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.