ग्राहकांसाठी सुवर्ण योग

 Pali Hill
ग्राहकांसाठी सुवर्ण योग

झवेरी बाजार - सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे यंदा दसऱ्यात सोने खरेदी ही ग्राहकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. चढया दरांमुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी सणासुदीत कमी होते. यंदा सोन्याचा दर तोळ्यासाठी 30 हजार रुपयांखाली गेला आहे. चांदीच्या दरातही 1 हजारांहून अधिक घसरण झाली आहे. गुरुवारी रात्री सोन्याचा 10 ग्रॅमचाल दर 29,970 रुपये होता. हा दर अजून दोन दिवस राहणार आहे. त्यामुळे सोने चांदीची जास्त प्रमाणात खरेदी होऊ शकते, असा विश्वास मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी व्यक्त गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची घसरण होत आहे, त्यामुळे सोन्याचे दर कमी होत असल्याचेही जैन यांनी म्हटले.

Loading Comments