महानंदचं दूध महागणार?


SHARE

मुंबई - शेतकर्‍यांसह सभासद संघांकडून महानंद डेअरीला पुरवल्या जाणार्‍या दुधाचा पुरवठा कमालीचा घटला आहे. त्यामुळे घटलेला पुरवठा वाढावा म्हणून पंधरा दिवसांत दुधाचा खरेदी दर दोन रुपयांनी वाढवावा लागला आहे. दूध संघांकडून २५ रुपये लिटरने मिळणार्‍या दुधाचा दर 8 डिसेंबर रोजी 26 रुपये झाला होता. त्यानंतरही पुरवठा न वाढल्याने पुन्हा खरेदी दरात 1 रुपयाची वाढ करून तो 27 रुपये करण्यात आला आहे. वारंवार वाढवावा लागणारा खरेदी दर, प्रक्रिया खर्च आणि वितरण खर्चामुळे महानंदच्या दुधाची दरवाढ अटळ असल्याचा दावा सूत्रांनी केलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या