Advertisement

इंग्लंड दौऱ्यासाठी रहाणेचा मुंबईतच सराव!


इंग्लंड दौऱ्यासाठी रहाणेचा मुंबईतच सराव!
SHARES

भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबईकर अजिंक्य रहाणेला स्थान मिळाले नसले तरी त्याच्या अाशा मात्र संपुष्टात अालेल्या नाहीत. अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव कसोटी खेळल्यानंतर भारताचा संघ अायर्लंड अाणि नंतर इंग्लंडला रवाना होणार अाहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रहाणे वांद्रे-कुर्ला संकुलात सराव करत अाहे.


मी नेहमीच मुंबईत माझ्या सरावाला सुरुवात करतो. प्रत्येक स्पर्धेअाधी मुंबईतूनच माझ्या सरावाचा श्रीगणेशा होत असतो. इंग्लंड दौऱ्याविषयी माझं निवड समितीशी बोलणं झालं असून त्यांनी इंग्लंड दौऱ्याविषयी मला सज्ज होण्याकरिता सांगितलं अाहे.
- अजिंक्य रहाणे, भारताचा क्रिकेटपटू


काही खेळाडू अाधीच इंग्लंडला जाणार

इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेता यावे, यासाठी काही कसोटीपटू लवकरच इंग्लंडमध्ये दाखल होणार अाहेत. इंग्लंडमध्ये ते काही सराव सामनेही खेळणार अाहेत. मात्र रहाणेला याविषयी कोणतीही कल्पना नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर काय होईल, हे सांगता येत नाही. पण मी निवड समितीशी नक्कीच बोलेन, असं रहाणेनं सांगितलं.


वर्ल्डकपमधील स्थान धोक्यात

रहाणेचा खराब फाॅर्म पाहता, त्याला वनडे अाणि टी-२० संघात स्थान देताना निवड समिती सकारात्मक नाही. अायपीएलमध्ये चमकदार कामगिरी करूनही रहाणेची इंग्लंडविरुद्धच्या टी-२० अाणि वनडे मालिकेसाठी निवड करण्यात अालेली नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या अायसीसी वर्ल्डकपमध्येही त्याच्या समावेशाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालं अाहे.


हेही वाचा -

अजिंक्य रहाणेला मिळणार बर्थडे गिफ्ट?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा