मुंबई सिनियर संघाचे निवड समिती अध्यक्ष अजित अागरकर अाणि अन्य तीन सदस्यांविरोधात दाखल केलेल्या अर्जाचा फैसला येत्या दोन ते तीन दिवसांत लागण्याची शक्यता अाहे. पारसी जिमखान्याचे उपाध्यक्ष अाणि क्रिकेट सचिव खोदादार याझदेगर्दी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रशासकीय समितीकडे निवड समितीच्या अकार्यक्षमतेबद्दल लेखी तक्रार केली असून निवड समितीच्या हकालपट्टीची मागणी केली अाहे. याझदेगर्दी यांनी एमसीएच्या ३०पेक्षा जास्त सदस्यांच्या सह्यांचे पत्र सुपूर्द केले असून एमसीएला याप्रकरणी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी केली अाहे. या अर्जावर २१ अाॅगस्ट रोजी फैसला होणार असला तरी येत्या २-३ दिवसांतच त्यावर निर्णय होण्याची शक्यता अाहे.
मुंबई रणजी संघासाठीच्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती जुलैपर्यंत लांबल्यानंतर अाता निवड समितीवरून नवा वाद उद्भवला अाहे. गेल्या महिन्यात निवड समितीने सराव शिबिरासाठी खेळाडूंची निवड केली. पण त्यात गेल्या मोसमात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान दिले गेले नाही. निवड समितीच्या या कारभारावर अनेक माजी खेळाडू, प्रशिक्षक तसेच क्लब सदस्यांनी नाराजी व्यक्त करून प्रशासकीय समितीकडे निवड समिती बरखास्त करण्याची मागणी केली अाहे.
अखेर याप्रकरणी अजित अागरकरने मौन सोडले. खेळाडूंची वागणूक अाणि त्यांचा बेशिस्तपणा पाहून अाम्ही काही खेळाडूंना सराव शिबिरातून वगळले. कामगिरीबरोबरच तुमची वृत्ती अाणि शिस्तीला किती महत्त्व अाहे, हा संदेश युवा खेळाडूंपर्यंत पोहोचवणे ही अामची इच्छा होती. गेल्या मोसमात खेळाडूंमध्ये वागणूक, वृत्ती अाणि शिस्तीचा अभाव असल्याचे जाणवले होते, म्हणूनच अाम्ही हा निर्णय घेतला, असे अागरकरने सांगितले.
हेही वाचा -
अखेर एमसीएने दिला 'त्या’ खेळाडूंना न्याय
मुंबईची निवड समिती खेळाडूंच्या करिअरशी खेळतेय – दिलीप वेंगसरकर