Advertisement

अवघे पाऊणशे वयमान... अजित वाडेकर, माधव अापटे यांनी जिंकली मने


अवघे पाऊणशे वयमान... अजित वाडेकर, माधव अापटे यांनी जिंकली मने
SHARES

काळाचा परिणाम प्रत्येकावर होतो, असं म्हणतात. वयोमानानुसार काहींना व्याधी जडतात, त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली मंद होत जातात. अनेकांना तर वयाच्या साठीनंतर येणारा प्रत्येक वाढदिवस हा फक्त काढदिवस असाच वाटू लागताे. पण काहींना वयाची बंधन वगैरे लागू होत नाहीत. वय कितीही वाढलं तरी त्यांचा उत्साह, उमेद एखाद्या तरुणालाही लाजवेल, इतका तरुण असतो. अजित वाडेकर अाणि माधव अापटे ही त्यापैकीच मूर्तिमंत उदाहरणं.


शिवाजी पार्कनं शनिवारी दादर यूनियन या अापल्या एकेकाळच्या कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मैत्रीपूर्ण सामन्याचं अायोजन करून गतस्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. भारत-पाकिस्तानसारखेच मुंबईच्या क्रिकेटमधील पूर्वीचे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येणार म्हटल्यावर मुंबईकर दर्दीरसिकांनी शिवाजी पार्कवर तोबा गर्दी केली होती.



दादर यूनियननं नाणेफेक जिंकून शिवाजी पार्कला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. मैदानावरील चौकार-षटकारांची अातषबाजी पाहून प्रेक्षकांचाही उत्साह दुणावला होता. त्यामुळे सहा षटकांचा हा मैत्रीपूर्ण सामना अाठ षटकांचा करण्यात अाला. प्रत्येक दोन किंवा एका षटकानंतर फलंदाज माघारी परतून दुसऱ्या फलंदाजांना संधी देत होते. अाठवं षटक सुरू होण्याअाधी दोन तरुण मैदानावर उतरले. ते म्हणजे अजित वाडेकर अाणि माधव अापटे. वयाची पंच्याहत्तरी अोलांडलेल्या या दोन फलंदाजांना मैदानात उतरताना पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. ८५व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या माधव अापटे यांनी पहिल्याच चेंडूवर 'चिकी रन' घेतलं अाणि सर्वांनीच तोडं बोटात घातली.


८५व्या वर्षातही माधव अापटे यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. २-३ षटके ते मैदानावर राहिले, पण त्यादरम्यान ते कायम धावत होते. वाडेकरांनीही सहा षटके क्षेत्ररक्षण करून अापणही अद्याप तरुण असल्याचं दाखवून दिलं. ६८ वर्षांचे मुंबईचे माजी प्रशिक्षक अाणि पंच नागेश ठाकूर यांनीही अफलातून क्षेत्ररक्षण करत सर्वांची वाहवा मिळवली.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा