Advertisement

भारताची नाराजी, पाकिस्तानाबाहेर होणार आशिया कप

भारत पाकीस्तान सुरू असलेला वाद आता क्रिकेटच्या सामन्यापर्यंत पोहोचला आहे.

भारताची नाराजी, पाकिस्तानाबाहेर होणार आशिया कप
SHARES

भारत पाकीस्तान सुरू असलेला वाद आता क्रिकेटच्या सामन्यापर्यंत पोहोचला आहे. कारण भारताच्या नकारामुळं पाकिस्तानमध्ये नियोजित असलेली आशिया कप २०२० ही स्पर्धा पाकिस्तानात खेळली जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे. यंदा या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडं होतं. परंतु, भारतानं दिलेल्या नकारानंतर या स्पर्धेचं ठिकाण बदलण्यात येणार आहे.


एका अहवालात मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२० या स्पर्धेच्या महिनाभर आधी आशिया कप २०२० खेळला जाणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडं होतं. पण पाकिस्तानकडून या स्पर्धेचं यजमानपद आता काढून घेण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी आता बांगलादेश, श्रीलंका किंवा दुबई या पर्यायांचा विचार केला जात आहे.

आशिया कप स्पर्धा टी-२० प्रकारात खेळली जाणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून आशिया कप स्पर्धा टी-२० पद्धतीने खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.

संबंधित विषय
Advertisement