Advertisement

भारत वि. ऑस्ट्रेलिया : चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात राहुल, अश्विन, कुलदीपला संधी

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात के. एल. राहुलला पुन्हा स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळं मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांच्यावर सलामीची जबाबदारी असणार आहे. तसंच, इशांत शर्माचे नाव या यादीत नाही. त्यामुळं वेगवान गोलंदाजांच्या यादीत उमेश यादवला स्थान देण्यात आलं आहे.

भारत वि. ऑस्ट्रेलिया : चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात राहुल, अश्विन, कुलदीपला संधी
SHARES

बीसीसीआयने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ जानेवारीला सिडनी इथं होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी १३ सदस्यांचा संघ बुधवारी जाहीर केला. चौथ्या सामन्यासाठी रविचंद्रन अश्विन, के. एल. राहुल आणि कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली आहे. परंत, अश्विन अजूनही दुखापतीतून बरा झाला नसल्यामुळं अंतिम अकरामध्ये अश्विनच्या जागी कुलदीपला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारताकडे आघाडी

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत भारतानं २-१ अशी आघाडी घेतली आहे. या कसोटीच्या पहिल्या सामन्यात भारताने ३१ धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. पर्थमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी कसोटी जिंकली होती. तर मेलबर्नमध्ये झालेल्या तिसऱ्या सामनात भारतानं ऑस्ट्रेलियाचा १३७ धावांनी पराभव करत मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळं सिडनी कसोटीकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

राहुल पुन्हा संघात

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात के. एल. राहुलला पुन्हा स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळं मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांच्यावर सलामीची जबाबदारी असणार आहे. तसंच, इशांत शर्माचे नाव या यादीत नाही. त्यामुळं वेगवान गोलंदाजांच्या यादीत उमेश यादवला स्थान देण्यात आलं आहे.

फिरकीला साजेशी

सिडनीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साजेशी आहे. त्यामुळं भारत अश्विन, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा यापैकी कुठल्याही दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, अश्विन अजूनही दुखापतीतून सावरला नसल्याने त्याला संघात स्थान मिळणार की नाही, याचा निर्णय गुरुवारी सामन्यापूर्वी होणार आहे.

सिडनी टेस्टसाठी भारतीय संघ:

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.

हेही वाचा-

म्हणून रोहित शर्मा सिडनी कसोटीला मुकणार

कसोटी पदार्पणातचं मयंक अग्रवालचे दोन नवे विक्रम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा