Advertisement

बीसीसीअायचं मुंबईतील मुख्यालय बंगळुरूला हलणार?

मुंबईतील एेतिहासिक वानखेडे स्टेडियमवर असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीअाय) मुख्यालयातून संपूर्ण जगातील क्रिकेटसंदर्भातील व्यवहार केले जातात. मात्र अाता हे व्यवहार मुंबईएेवजी बंगळुरूतून होण्याची शक्यता अाहे.

बीसीसीअायचं मुंबईतील मुख्यालय बंगळुरूला हलणार?
SHARES

मुंबई म्हणजे क्रिकेटची पंढरी. याच मुंबईतील एेतिहासिक वानखेडे स्टेडियमवर असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीअाय) मुख्यालयातून संपूर्ण जगातील क्रिकेटसंदर्भातील व्यवहार केले जातात. मात्र अाता हे व्यवहार मुंबईएेवजी बंगळुरूतून होण्याची शक्यता अाहे. कारण मुंबईतील बीसीसीअायचं हे मुख्यालय अाता बंगळुरूला हलवलं जाण्याची शक्यता अाहे. येत्या काही वर्षांत नॅशनल क्रिकेट अकादमीला (एनसीए) मूर्त स्वरूप मिळाल्यानंतर हे मुख्यालय बंगळुरूमध्ये हलवलं जाणार अाहे.


बीसीसीअायला मिळाली ४० एकर जागा

बंगळुरूतील गार्डन सिटी इथं बीसीसीअायला स्वतःची ४० एकर जागा मिळाली असून याच ठिकाणी एनसीए उभारली जाणार अाहे. मुंबईतील क्रिकेट सेंटरमधील बीसीसीअायच्या मुख्यालयाची ही इमारत भाड्याची असल्यामुळे अाता मुंबईतील हे मुख्यालय हलवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं बीसीसीअायच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना वाटतं. नव्या ठिकाणी फाइव्ह स्टार सोयीसुविधा उभारणे शक्य होणार अाहे.


पदाधिकाऱ्यांच्या हाॅटेलच्या बिलाचा खर्च वाचवणार

बीसीसीअायचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी हे महिन्यातून २५ दिवस प्रवास करत असून त्यांचा खर्च हा कोटींच्या घरात जातो. त्यामुळेच पदाधिकाऱ्यांच्या हाॅटेलचा खर्च वाचविण्याकरिता प्रशासकीय समितीने सूचना मागवल्या अाहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा