Advertisement

आयपीएलच्या १३व्या हंगामाचा मार्ग मोकळा

आयपीएल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आयपीएलच्या १३व्या हंगामाचा मार्ग मोकळा
SHARES

यंदा कोरोनामुळं इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्थगित करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु, आता टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आल्यानं बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळं आता आयपीएल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बीसीसीआयनं आयपीएच्या १३व्या हंगामासाठी सर्व तयारी केली होती. आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या संघांमध्ये खेळांडूंचा लिलावही झाला होता. या स्पर्धेसाठी लागणारी सर्व तयारी बीसीसीआयनं केली होती. परंतु, कोरोनावर सर्वावरच पाणी फिरलं. कोरोनामुळं तब्बल ४ हजार कोटींचं आर्थिक नुकसान होण्याची भीती बीसीसीआयला सतावत होती. परंतु, हे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असलेल्या बीसीसीआयचा जीव आता भांड्यात पडला आहे.

ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन आयसीसीनं पुढं ढकललं आहे. सोमवारी आयसीसीनं याबद्दल अधिकृत घोषणा केली. त्यामुळं बीसीसीआयला आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करता येणं शक्य होणार आहे. २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. मागील २ महिन्यांपासून टी-२० विश्वचषकाबद्दल निर्णय घेण्यामध्ये आयसीसी चालढकल करत होतं. परंतू, यजमान ऑस्ट्रेलियानं आयोजनाबद्दल असमर्थता दाखवल्यानंतर आयसीसीनं ही स्पर्धा पुढे ढकलली आहे.

आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी बीसीसीआयनं याआधीच तयारी सुरु केली असून, यंदाची स्पर्धा युएईमध्ये भरवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. टी-२० विश्वचषाचं आयोजन अधिकृतरित्या पुढे ढकलणं जाण्यासाठी बीसीसीआय वाट पाहत होती. सोमवारी आयसीसीनं ही घोषणा केल्यानंतर आता बीसीसीआयसमोरचा मार्ग मोकळा झाला आहे.



हेही वाचा -

मुंबईत कोव्हिड योद्ध्यांची हंगामी भरती

महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा