Advertisement

नमो वांद्रे ब्लास्टर्सच्या विजयात गोलंदाज चमकले


नमो वांद्रे ब्लास्टर्सच्या विजयात गोलंदाज चमकले
SHARES

लेगस्पिनर प्रवीण तांबे, अझर अन्सारी अाणि एेश्वर्य सुर्वे या गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर नमो वांद्रे ब्लास्टर्स संघाने टी-२० मुंबई लीगमध्ये अार्क्स अंधेरी संघाचा सहज धुव्वा उडवला. नमो वांद्रे ब्लास्टर्सच्या गोलंदाजांच्या तालावर अार्क्स अंधेरीच्या फलंदाजांनी शरणागती पत्करल्यामुळे त्यांचा डाव अवघ्या १०७ धावांवर संपुष्टात अाला. कर्णधार श्रेयस अय्यर अाणि निखिल पाटील यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचून अापल्या संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.


श्रेयसचं दुसरं अर्धशतक

अार्क्स मुंबई संघाचे १०८ धावांचे उद्दिष्ट गाठताना वांद्रे ब्लास्टर्सने सलामीवीर केविन अल्मेडाची (९) विकेट स्वस्तात गमावली. मात्र त्यानंतर श्रेयस अाणि निखिल यांनी नाबाद खेळी साकारत नमो वांद्रे ब्लास्टर्सला ४० चेंडू राखून अाणि नऊ विकेट्सनी अारामात विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने तुफानी फलंदाजी करताना या स्पर्धेतलं सलग दुसरं अर्धशतक साजरं केले. त्याने ३५ चेंडूंत ५ चौकार अाणि ६ षटकारांसह नाबाद ५३ धावा फटकावल्या. त्याला चांगली साथ देणाऱ्या निश्किल पाटीलनेही ४ चौकार अाणि १ षटकारासह नाबाद ३९ धावा केल्या.

प्रवीण तांबेची सुरेख गोलंदाजी

सुब्रह्मण्यम डी. (२२) अाणि अखिल हेरवाडकर (१४) यांनी अार्क्स अंधेरी संघाला ३५ धावांची सलामी दिल्यानंतर एेश्वर्य सुर्वेने त्यांना पहिला झटका दिला. त्यानंतर प्रवीण तांबेने अार्क्स अंधेरीची मधली फळी कापून काढली. मधल्या फळीतील  सिद्धार्थ चिटणीस (२१) वगळता नंतरच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता अाली नाही. त्यामुळे अार्क्स अंधेरीचा डाव १९ षटकांत १०७ धावांवर संपुष्टात अाला. तांबेने तीन तर अन्सारी अाणि एेश्वर्य यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा