Advertisement

राष्ट्रकुल देशांच्या उच्चायुक्तांमध्ये रंगला क्रिकेटचा थरार


राष्ट्रकुल देशांच्या उच्चायुक्तांमध्ये रंगला क्रिकेटचा थरार
SHARES

ब्रिटिश उप उच्चायुक्तांतर्फे मुंबईतील पोलीस जिमखान्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी क्रिकेटपटू अाणि राष्ट्रकुल देशांच्या उच्चायुक्तांमध्ये मैत्रीपूर्ण टी-२० क्रिकेट सामन्यांचं अायोजन करण्यात अालं होतं. खाण्याच्या माध्यमातून राष्ट्रकुल देशांमधील संबंध, मूल्ये अखंडित जपली जावीत, हा या सामन्याच्या अायोजनामागचा मुख्य हेतू होता.

अनेक राष्ट्रकुल देशांमध्ये क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. त्यामुळे या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पुरुष अाणि महिलांचा सहभाग होता. अाॅस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, श्रीलंका अाणि ब्रिटनमधील उच्चायुक्तांनी क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या मुंबईतील क्रिकेटपटूंविरोधात खेळण्याचा अानंद लुटला. एमसीएचे दीपक पाटील अाणि मुंबई पोलीस जिमखान्याचे व्यवस्थापक सुर्वे यांनी या सामन्याच्या अायोजनासाठी अथक परिश्रम घेतले होते.


या उपस्थित पाहुण्यांमध्ये क्विन्स यंग लीडर अवाॅर्ड विजेते, विद्वान मंडळी अाणि राष्ट्रकुल देशांमधील प्रमुख मंडळी उपस्थित होती. १२ मार्च रोजी राष्ट्रकुल दिनानिमित्त ते २२ एप्रिलपर्यंत ५३ राष्ट्रकुल देशांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल बिग लंच या कार्यक्रमानुसार मुंबईत या डिनरचे अायोजन करण्यात अाले होते. काॅमनवेल्थ हेड्स अाॅफ गव्हर्नमेंट मीटिंग २०१८ (सीएचअोजीएम) अाधी या डिनरचं अायोजन करण्यात अालं होतं.

ब्रिटनचे वेस्टर्न भारतातील उप उच्चायुक्त तसेच भारत अाणि दक्षिण अाशियाचे इंटरनॅशनल ट्रेड डिपार्टमेंटचे महासंचालक क्रिस्पिन सायमन यांनी सांगितले की, 'क्रिकेट हा सर्वांना एकत्र अाणणारा खेळ असून लोकांनी, समाजाने एकत्र यावेत, अशीच अामची इच्छा अाहे. राष्ट्रकुल देशांमध्ये असलेले दृढ संबंध असेच अबाधित रहावेत अाणि राष्ट्रकुल देशांची मूल्ये कायम राहावीत, यासाठी या कार्यक्रमांचं अायोजन करण्यात अालं होतं.'

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा