Advertisement

स्लेजिंग अन् हाँकिंग माझे नावडते- अजिंक्य रहाणे

बईतील वानखेडे स्टेडियमवर शनिवार २४ मार्च रोजी 'टाटा हाॅर्न नाॅट अोके प्लीज' हा प्रदर्शनीय टी-२० सामना खेळविण्यात येणार अाहे. या सामन्यात दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी मुंबईकरांना लाभणार अाहे. या सामन्यात अजिंक्यसुद्धा मैदानात उतरणार अाहे. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत मुंबईतील वाहतूक समस्येविषयी अाणि हाॅर्न वाजवून धूमाकुळ घालणाऱ्या वाहनचालकांना रहाणेनं मोलाचा सल्ला दिला.

स्लेजिंग अन् हाँकिंग माझे नावडते- अजिंक्य रहाणे
SHARES

ध्वनीप्रदूषण ही मुंबईतली एक गंभीर समस्या बनली अाहे. त्यामुळे क्रिकेटच्या माध्यमातून मी त्याविषयी जनजागृती करणार अाहे. क्रिकेट खेळताना मला मैदानावर स्लेजिंग केलेलं जसं अावडत नाही. तसंच वाहन चालवताना हाँकिंगही अावडत नाही, अशा शब्दांत मुंबईचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेनं ध्वनीप्रदूषणाविषयीच्या अापल्या भावना व्यक्त केल्या.


प्रदर्शनीय सामन्याचं आयोजन

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शनिवार २४ मार्च रोजी 'टाटा हाॅर्न नाॅट अोके प्लीज' हा प्रदर्शनीय टी-२० सामना खेळविण्यात येणार अाहे. या सामन्यात दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी मुंबईकरांना लाभणार अाहे. या सामन्यात अजिंक्यसुद्धा मैदानात उतरणार अाहे. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत मुंबईतील वाहतूक समस्येविषयी अाणि हाॅर्न वाजवून धूमाकुळ घालणाऱ्या वाहनचालकांना रहाणेनं मोलाचा सल्ला दिला.


'हे' दिग्गज खेळाडू मैदानात

महाराष्ट्र मोटार वाहन विभाग (महाराष्ट्र) अाणि टाटा समूहाच्या वतीने वानखेडे स्टेडियमवर २४ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या या प्रदर्शनीय सामन्यात दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार अाहे. 

नो हाँकिंग प्लीज या संघात लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, युवराज सिंग, दिनेश कार्तिक, अार्यमन बिर्ला, कृणाल पंड्या, हरभजन सिंग, जसप्रीत बुमरा, शिवम मावी, शार्दूल ठाकूर हे खेळाडू असतील. 

तर, रोड सेफ्टी इलेव्हन संघात इशान किशन, शिखर धवन, सुरेश रैना, मनोज तिवारी, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, अभिषेक नायर, युझवेंद्र चहल, कमलेश नागरकोटी, विनय कुमार अाणि प्रवीण तांबे हे क्रिकेटपटू असतील.


हेही वाचा -

मुंबईकर अजिंक्य रहाणेवर ४ कोटींची बोली

अजिंक्य रहाणे लवकरच फाॅर्मात येईल – वाडेकर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा