Advertisement

अजिंक्य रहाणे लवकरच फाॅर्मात येईल – वाडेकर


अजिंक्य रहाणे लवकरच फाॅर्मात येईल – वाडेकर
SHARES

प्रत्येक महान खेळाडूलाही बॅडपॅचमधून जावे लागले अाहे. सुनील गावस्करसारख्या फलंदाजालाही बराच वेळ खराब फाॅर्ममधून जावे लागले होते. अजिंक्य रहाणे हा भारताने जगाला दिलेल्या महान खेळाडूंपैकी एक अाहे. तो निश्चितपणे या बॅडपॅचमधून बाहेर येईल. निवड समितीने रहाणेवर विश्वास दाखवला असून तो लवकरच फाॅर्मात येईल अाणि भारतासाठी असंख्य धावा त्याच्या बॅटमधून बाहेर येतील, असा विश्वास भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी व्यक्त केला.


अाफ्रिका दौरा भारतासाठी अाव्हानात्मक

टीम इंडियासाठी दक्षिण अाफ्रिका दौरा फारच अाव्हानात्मक ठरणार अाहे. तेथील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या असतात. सध्या भारतीय संघ चांगली कामगिरी करत असून हा संघ समतोल अाणि अनुभवी अाहे. विराट कोहली हा वेगळ्याच धाटणीचा अाक्रमक फलंदाज असून त्याची कुणाशीही तुलना करता येणार नाही. संघासाठी खेळणारा अाणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी धडपडणारा हा खेळाडू अाहे.


वाडेकरांना डीडीएफचा जीवनगौरव पुरस्कार

डाॅ. दयाल फाउंडेशनतर्फे मुंबईत वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात अाले. माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांना डाॅ. रामेश्वर दयाल जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात अाले. तर क्रिकेटमधील सर्वोत्तम योगदानाबद्दलचा डाॅ. एस. दयाल पुरस्कार मुंबईचा माजी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार याला अाणि प्रशिक्षणामधील सर्वोत्तम पुरस्कार माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांना देण्यात अाला. क्रीडा प्रशासनामधील सर्वोत्तम पुरस्कार प्रो. रत्नाकर शेट्टी यांना देण्यात अाला.



राॅबिन उथप्पाच्या हस्ते क्रिकेट कीटचे वाटप

डाॅ. दयाल फाऊंडेशनतर्फे गरजू अाणि होतकरू क्रिकेटपटूंना दरवर्षी क्रिकेट कीटचे वाटप करण्यात येते. यावर्षीही देशातील ५० युवा खेळाडूंना भारताचा अाक्रमक फलंदाज राॅबिन उथप्पाच्या हस्ते क्रिकेट कीट देण्यात अाले. त्याचबरोबर महिलांना शिलाई मशीनही देण्यात अाल्या.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा