Advertisement

मुंबईकर अजिंक्य रहाणेवर ४ कोटींची बोली, बेन स्टोक्स १२.५ कोटींचा धनी


मुंबईकर अजिंक्य रहाणेवर ४ कोटींची बोली, बेन स्टोक्स १२.५ कोटींचा धनी
SHARES

गेल्या काही महिन्यांपासून खराब फाॅर्ममध्ये असलेल्या अजिंक्य रहाणेवर अायपीएलच्या ११ व्या पर्वाच्या मोसमात सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. अातापर्यंत राजस्थान राॅयल्स अाणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा भाग असलेल्या रहाणेवर २ कोटींची बेस प्राइज होती. अजिंक्य रहाणेला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स अाणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात चढाअोढ रंगली. अखेर मुंबईकर रहाणेवर दिल्ली डेअरडेव्हिल्सनं ४ कोटींची बोली लावली. बंगळुरू इथं सुरू असलेल्या अायपीएलच्या लिलावात इंग्लंडचा बेन स्टोक्स अातापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला अाहे. राजस्थान राॅयल्सने त्याला १२.५ कोटींना विकत घेतलं अाहे. मुंबई इंडियन्सने किराॅन पोलाॅर्डला कायम राखलं अाहे. 'राइट टू मॅच'चा अाधार घेत मुंबई इंडियन्सनं अष्टपैलू क्रिकटपटू पोलार्डला ५.४ कोटी रुपयांना संघात सामावून घेतलं अाहे.



अन् ख्रिस गेलवर बोलीच लागली नाही

सर्वात स्फोटक फलंदाज अशी अोळख निर्माण करणाऱ्या ख्रिस गेलवर यंदाच्या अायपीएलमध्ये एकाही फ्रँचायझीने बोली लावली नाही. यापूर्वीही एका मोसमात गेलवर कुणीच बोली लावली नव्हती. त्यानंतर बंगळुरू राॅयल चॅलेंजर्सने त्याला विकत घेतले. त्याच वर्षी गेलनं सर्वाधिक धावा फटकावत अाँरेंज कॅप पटकावली होती. गेलसह दक्षिण अाफ्रिकेचा हाशीम अमला तसंच भारताचा मुरली विजय अाणि न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलला विकत घेण्यासाठी एकाही फ्रँचायझीनं रस दाखवला नाही.


मनीष पांडे, लोकेश राहुलवर सर्वाधिक बोली

अायपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी भारताच्या स्टार खेळाडूंपैकी लोकेश राहुल अाणि मनीष पांडे यांनी सर्वांना अाश्चर्यचकित केले. लोकेश राहुलला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, राजस्थान राॅयल्स अाणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चढाअोढ रंगली होती. त्यानंतर शेवटच्या क्षणी किंग्स इलेव्हन पंजाबने उडी घेत राहुलला ११ कोटी रुपयांना विकत घेतले. अायपीएलमधील पहिला भारतीय शतकवीर ठरलेल्या मनीष पांडेला सनरायझर्स हैदराबादने ११ कोटी रुपयांची बोली लावली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा