Advertisement

पृथ्वी शाॅने ठाेकलं चौथंं फर्स्ट क्लास शतक

यंदाच्या सिझनमध्ये मुंबई क्रिकेट संघाचा ओपनर बॅट्समन असलेल्या पृथीने ५ पैकी ४ सामन्यात शतक झळकावण्याची कामगिरी केली आहे.

पृथ्वी शाॅने ठाेकलं चौथंं फर्स्ट क्लास शतक
SHARES

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शानदार फाॅर्मचा सिलसिला कायम राखत १७ वर्षांच्या पृथ्वी शाॅने भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या ओडिशाविरोधातील रणजी सामन्यात बुधवारी दमदार शतक ठोकलं. यंदाच्या सिझनमध्ये मुंबई क्रिकेट संघाचा ओपनर बॅट्समन असलेल्या पृथ्वीने ५ पैकी ४ सामन्यात शतक झळकावण्याची कामगिरी केली आहे.


फक्त सचिन पुढे

१८ वर्षे पूर्ण होण्याआधी विक्रमी शतक ठोकण्याच्या बाबतीत पृथ्वीच्या पुढे फक्त एकच खेळाडू आहे, तो म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिनच्या नावावर सर्वाधिक ७ शतकांची नोंद आहे.


उत्तम स्ट्राईक रेट

ओडिशाविरोधात खेळताना राईट हॅण्डेड बॅट्समन पृथ्वीने १५३ बाॅल्समध्ये १०५ रन्स केल्या. या खेळीत त्याने ६८.६३ चा स्ट्राईक रेट ठेवत १८ बाॅऊड्रीज मारल्या. ४४ व्या ओव्हरमध्ये बसंत मोहंतीच्या बाॅलवर पृथ्वी एलबीडब्ल्यू झाला.




पदार्पणातच शतक

क्रिकेट करिअरच्या सुरूवातीपासूनच पृथ्वीने जबरदस्त परफाॅर्मन्स देत मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रणजी ट्राॅफीच्या पदार्पणाच्या मॅचमध्ये शतक करण्यापाठोपाठ त्याने दुलीप ट्राॅफीच्या पदार्पणाच्या मॅचमध्येही शतक साजरं करून राष्ट्रीय पातळीवर सर्वांना दखल घ्यायला लावली.


न्यूझीलंडविरोधातही छाप

न्यूझीलंडविरोधातील वाॅर्मअप वन-डे मॅचमध्ये इंडियन बोर्ड प्रेसिडंट Xl संघाकडून खेळताना पृथ्वीने ६६ धावा केल्या. त्याच्या खेळाचं कौतुक न्यूझीलंडचा फास्ट बाॅलर ट्रेन्ट बोल्टनेही केलं.

इंग्लंडच्या अंडर-१९ दौऱ्यानंतर बीसीसीआयच्या कनिष्ठ निवड समितीने पृथ्वीचा अंडर-१९ एशिया कपच्या टीममध्ये समावेश केला असून त्याला रणजी ट्राॅफीत मुंबईचं प्रतिनिधीत्व करण्याचीही सूचना केली होती. त्यानुसार पृथ्वी सर्वच ठिकाणी दमदार कामगिरी करताना दिसत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा