Advertisement

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न यांचं निधन

क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न यांचं निधन
SHARES

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न (Australia cricket Shane Warne) यांचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सहवागने याबाबत ट्विट दुःख व्यक्त केलं आहे. त्यानं लिहिलं आहे की, “विश्वासच बसत नाही. महान फिरकीपटूंपैकी एक, फिरकीला कूल बनवणारा, सुपरस्टार शेन वॉर्न राहिला नाही. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. त्याचं कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना.”

ऑस्ट्रेलियाचा महाग लेगस्पिनर म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. जगातील क्रिकेट इतिहासात शेन वॉर्न यांना महान बॉलरपैकी एक मानलं जातं. १९९२ मध्ये ते पहिली टेस्ट मॅच खेळले होते आणि श्रीलंकाचे मुरलीधरननंतर १००० आंतरराष्ट्रीय विकेट (टेस्ट आणि वनडे मॅच) घेऊन दुसरे बॉलर ठरले होते.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा