Advertisement

ऋतूराजची तुफानी फलंदाजी; पहिल्याच सामन्यात​ मुंबईचा पराभव


ऋतूराजची तुफानी फलंदाजी; पहिल्याच सामन्यात​ मुंबईचा पराभव
SHARES

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १४ व्या टप्प्याच्या दुसऱ्या पर्वाला रविवार २९ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामाना झाला. या सामन्यात चेन्नईनं विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघानं गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी १५७ धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार सुरुवात करुन दिली होती. पावर प्लेमध्ये चेन्नईचे ४ फलंदाज तंबूत दाखल झाले होते. मात्र, चेन्नईचा सलामीवीर ऋतूराज गायकवाड यानं अर्धशतकी खेळी करत संघाला १५७ धावांपर्यंत मजल मारून दिली. ऋतूराजनं नाबाद ८८ धावांची आयपीएलमधील त्याची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी साकारली. यात ४ खणखणीत षटकार आणि ९ नजाकती चौकारांचा समावेश होता.

सामन्याची नाणेफेक जिंकून चेन्नईनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ट्रेंट बोल्टनं पहिल्या षटकात फॉर्मात असलेल्या फॅफ ड्यू प्लेसिस याला माघारी धाडत खणखणीत सुरुवात करुन दिली. त्यानंतर अॅडम मिलने यानं मोइन अली याला झेलबाद करुन मुंबईला दुसरं यश मिळवून दिलं. चेन्नईच्या संघाला सुरुवातीलाच दोन धक्के बसलेले असताना अंबाती रायुडू मिलनेच्या बाऊन्सवर दुखापतग्रस्त झाला आणि पव्हेलियनमध्ये दाखल झाला.

चेन्नईच्या फॅफ ड्यू प्लेसिस, मोइन अली आणि रायुडू यांना खातंही उघडता आलं नाही. संघावर दबाव निर्माण न होऊ देण्यासाठी सुरेश रैना (४) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. बोल्टनं रैनाला माघारी धाडलं. महेंद्रसिंग धोनीवर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी आली. सामन्याच्या चौथ्याच षटकात धोनीवर फलंदाजीची वेळ आली. धोनीनं सावध सुरूवात केली होती. पण अॅडम मिलनेच्या गोलंदाजीवर तोही झेल देऊन बसला.

बोल्डनं धोनीचा जबरदस्त झेल टिपला. चेन्नईच्या संघ पूर्णपणे बॅकफूटवर आला होता. याही परिस्थितीत ऋतूराज गायकवाड आपली विकेट सांभाळून ठेवत संयमानं खेळत होता. अखेरच्या पाच षटकांमध्ये ऋतूराजनं आक्रमक खेळीला सुरुवात करत संघाला बॅकफूटवरुन फ्रंटफूटवर आणलं. ड्वेन ब्रावोनंही चांगली साथ देत ८ चेंडूत २३ धावांची खेळी साकारली. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा