Advertisement

प्रबोधन टी-२० स्पर्धेत दादर यूनियनची विजयी सलामी


प्रबोधन टी-२० स्पर्धेत दादर यूनियनची विजयी सलामी
SHARES

रौनक शर्मा (नाबाद ६०) आणि शिवम दुबे (नाबाद २९ आणि ४ विकेट्स) यांच्या दमदार खेळाच्या बळावर कर्नाटक स्पोर्टिंग असोशिएशनने एमआयजी क्रिकेट क्लबचा ४ विकेट्स राखून पराभव करत ११व्या प्रबोधन मुंबई टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. दादर यूनियन संघाने कांगा साखळी ‘अ’ गटातील विजेत्या पार्कोफोन संघावर ६ विकेट्स राखून मात केली.


पार्कोफोनची फलंदाजी गडगडली

साईराज पाटील (२ विकेट्स), अक्षय दरेकर (२ विकेट्स) आणि दिनेश साळुंखे (२ विकेट्स) यांच्या अचूक गोलंदाजीसमोर पार्कोफोन संघाला केवळ १२७ धावाच करता आल्या. नील नार्वेकर (३७) आणि मुशीर खान (२०) यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजानी साफ निराशा केली. या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना साईराज पाटीलने आपल्या अष्टपैलू खेळ करत नाबाद ४१ धावांची खेळी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


कर्नाटक असोसिएशनचा विजय

एमअायजी क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करत ९ बाद २०३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. केविन अल्मेडा (४२) आणि निखील पाटील (५५) यांचे त्यात योगदान होते. हे अाव्हान पार करताना कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनची ५ बाद ९२ अशी अवस्था झाली होती. मध्यमगती गोलंदाज यशराज मालपने दोन विकेट्स मिळवत कर्नाटकला धक्के दिले. मात्र रौनक शर्माने शिवम दुबेसह ८२ धावांची भागीदारी रचत कर्नाटकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


हेही वाचा -

अवघे पाऊणशे वयमान... अजित वाडेकर, माधव अापटे यांनी जिंकली मने

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा