Advertisement

आर अश्विनचा आयपीएल सोडण्याचा निर्णय, 'हे' आहे कारण

अश्विनने आयपीएच्या १४ व्या पर्वात दिल्लीसाठी ५ मॅचेस खेळल्या आहेत. आर अश्विनच्या निर्णयावर दिल्ली कॅपिटल्सनेही प्रतिक्रिया दिली आहे.

आर अश्विनचा आयपीएल सोडण्याचा निर्णय, 'हे' आहे कारण
SHARES

आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र असलेल्य़ा आर अश्विनने आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांमधून माघार घेतली आहे. आर अश्विनने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. 

कुटुंबाला करोनाची लागण झाली असल्याने आर अश्विनने हा निर्णय घेतला आहे. विवारी दिल्लीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना खेळला. यात अश्विन देखील खेळला होता. सामना झाल्यानंतर अश्विनने सोशल मीडियावर ही माहिती दिली. या कठिण काळात मी कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचं त्याने सांगितलं.

अश्विनने ट्विटमध्ये म्हटलं की, आयपीएलच्या १४ व्या पर्वात मी उद्यापासून ब्रेक घेतोय. माझे कुटुंबीय कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. या कठीण काळात मी माझ्या कुटुंबासमवेत असावं असं मला वाटतं. जर पुढील गोष्टी योग्य दिशेने घडत गेल्या तर मी पुन्हा दिल्लीसाठी खेळायला येईन 

अश्विनने आयपीएच्या १४ व्या पर्वात दिल्लीसाठी ५ मॅचेस खेळल्या आहेत. आर अश्विनच्या निर्णयावर दिल्ली कॅपिटल्सनेही प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्विट करत संकटाच्या या काळात आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंनी स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी स्पर्धा सोडण्याचं जाहीर केलं आहे. दोघे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून खेळत होते. बंगळुरुने ट्वीट करत हे दोन खेळाडू स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन दोघेही वैयक्तिक कारणांसाठी ऑस्ट्रेलियात परतले आहेत. यापुढच्या सामन्यात ते खेळणार नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्यांच्या निर्णयाचा सन्मान करते. त्यांना संपूर्ण मदतही करत आहे, असं ट्वीट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने केलं आहे.



हेही वाचा -

दिलासादायक! मुंबईतील 'इतके' टक्के रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईतील वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार - महापौर किशोरी पेडणेकर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा