Advertisement

मुंबईतील वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार - महापौर किशोरी पेडणेकर

वस्तीपातळीवर जाऊन लस देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबईतील वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार - महापौर किशोरी पेडणेकर
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका अनेक प्रयत्न करत आहे. अनेक नव्या उपाययोजना महापालिका व राज्य सरकारनं तयार केल्या असून, कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण सुरू केलं आहे. कोरोना लस केंद्रावर उपलब्ध आहे की नाही, याची माहिती घेऊनच लस घेण्यास जावे. तसेच सध्या तरी घरोघरी जाऊन लस देण्याचा मुंबई महापालिकेचा विचार नाही. मात्र वस्तीपातळीवर जाऊन लस देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 

मुंबईत सध्या तरी ३० ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरु आहेत. तर ६० खासगी ठिकाणी लस दिल्या जात आहे. सध्या तरी मुंबईत दुसऱ्या कोरोना डोसला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. येत्या १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. जे पहिले येतील त्यांना लस दिली जाईल. सध्या मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण सुरु आहे. खासगी रुग्णालयातही लसीकरण केले जात असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

केंद्राने दिलेल्या अॅपमध्ये नोंदणी करुन लस दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. केंद्राने दिलेल्या सूचना त्या आपण पाळून सर्व लसीकरण करत आहोत. मुंबईत दर दिवसाला १ लाख लस देण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. कोवॅक्सिन दोन दिवसात मुबलक प्रमाणात येतील, असेही महापौर म्हणाल्या.

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सकारात्मक चर्चा सुरु आहे. येत्या दोन दिवसात लसीचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीचा मोठा साठा उपलब्ध करुन दिला. मी त्यांचे आभार मानते, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. मुंबईत जिथे गर्दी होते तिथे गर्दी कमी व्हावी ही अपेक्षा आहे. मुंबईत दुकानदारांनी स्वयंसेवक नेमावे आणि काम करावं. गर्दी करु नका. राज्य सरकार जो निर्णय घेतील तो सर्वांच्या हिताचा आहे. कोरोनाच रूप गडद आहे. लस ही सर्वाना द्यायची आहे. एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा