Advertisement

IPL 2021: पहिल्या सामन्यात हार्दीक पंड्यानं गोलंदाजी का केली नाही? वाचा कारण

या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यानं फिट असूनही गोलंदाजी केली नाही. परंतू, त्यानं गोलंदाजी का केली नाही याचं उत्तर भारताचा माजी खेळाडू व मुंबई इंडियन्सच्या ऑपरेशन डायरेक्टर झहीर खान यानं दिली.

IPL 2021: पहिल्या सामन्यात हार्दीक पंड्यानं गोलंदाजी का केली नाही? वाचा कारण
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) (IPL 2021) पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झालेल्या समान्यात विराटच्या बंगळुरूनं मुंबईवर विजय मिळवला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) स्वस्त:त बाद झाला. परंतू, संघातील इतर खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मात्र, या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यानं फिट असूनही गोलंदाजी केली नाही. परंतू, त्यानं गोलंदाजी का केली नाही याचं उत्तर भारताचा माजी खेळाडू व मुंबई इंडियन्सच्या ऑपरेशन डायरेक्टर झहीर खान यानं दिली.

या सामन्यात मुंबई इंडियन्सनं (mumbai indians) बंगळुरुसमोर १५९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. बंगळुरुनं हे लक्ष्य २ गडी राखून गाठलं. या सामन्यात अष्टपैलू हार्दीक पंड्या याच्याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा होत्या. फलंदाजीत १० चेंडू खेळत १३ धावांवर असताना हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. चाहत्यांच्या पदरी निराशा पडल्यानं गोलंदाजीत तो ही उणीव भरून काढेल अशी आशा होती. मात्र, त्यानं बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी केली नाही. मात्र आता मुंबई इंडियन्सच्या ऑपरेशन डायरेक्टर झहीर खान याने खुलासा केला आहे.

'हार्दीक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचं संघात असणं हे महत्त्वाचं आहे. मागील सामन्यांच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याला गोलंदाजी दिली नाही. त्यानं इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ९ षटकं टाकली होती. फिजिओनं त्याला गोलंदाजी करण्याचा न करण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या खांद्याला थोडी दुखापत आहे. मात्र तो त्यातून लवकरच बरा होईल. पुढच्या सामन्यांमध्ये हार्दीक गोलंदाजी करताना दिसेल', असं झहीर खान याने सांगितलं.

'हार्दीकच्या गैरहजेरीत वेस्टइंडिजचा अष्टपैलू कायरन पोलार्ड संघासाठी गोलंदाजीत सहावा पर्याय आहे. त्यामुळं आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. यावेळी आयपीएल स्पर्धा एकाच ठिकाणी आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा क्विटन डिकॉक आता फिट आहे. त्यानं क्वारंटाइनचा अवधी पूर्ण केला आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात खेळण्यास तो सज्ज असेल', असंही झहीर खान याने पुढे सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा