Advertisement

'या' ५ वादांमुळं 'आयपीएल'चं नाव झालं खराब

प्रत्येक आयपीएल मोसमात काही ना काही लहान-मोठे वाद समोर आले आहेत. या वादांपैकी ५ असे वाद आहेत, ज्यामुळं इंडियन प्रिमीयर लीगचं नाव खराब झालं आहे.

'या' ५ वादांमुळं 'आयपीएल'चं नाव झालं खराब
SHARES

इंडियन प्रिमीयर लीगचा (आयपीएल) १४ वा मोसमच्या दुसऱ्या सत्राला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळं सर्वत्र आयपीएलच्या चर्चांना उधाण आलंय. तसंच, आयपीएल म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते खेळाडूंचे वाद. आत्तापर्यंत प्रत्येक आयपीएल मोसमात काही ना काही लहान-मोठे वाद समोर आले आहेत. या वादांपैकी ५ असे वाद आहेत, ज्यामुळं इंडियन प्रिमीयर लीगचं नाव खराब झालं आहे.

१. स्पॉट फिक्सिंग

आयपीएलमध्ये सर्वात मोठा वाद म्हणजे २०१३ यावर्षात झालेले स्पॉट फिक्सिंग. या वादामुळं संपूर्ण भारतीय क्रिकेटविश्व हादरलं होतं. या प्रकरणात अडकलेल्या एस श्रीसंत, अजित चंडेला आणि अंकित चव्हान या ३ खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी अटकही केली होती. तसंच यावेळी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे राज कुंद्रा आणि गुरुनाथ मय्यपन हे मोठे अधिकारी बेटिंगचे प्रकरणात अडकल्याने या दोन्ही संघांवर २०१६ आणि २०१७ या २ मोसमांसाठी बंदी घालण्यात आली.

२. श्रीसंत आणि हरभजन सिंग

आयपीएलच्या पहिल्या मोसमातील श्रीसंत आणि हरभजन सिंग यांच्यातील वाद तर सर्वांच्याच लक्षात असेल. त्या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत असलेल्या श्रीसंतला भर मैदानातच मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने कानाखाली मारली होती.

३. शेन वॉर्न आणि  संजय दिक्षित

२०११ मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असणाऱ्या शेन वॉर्नने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सामना पराभूत झाल्यानंतर राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय दिक्षित यांना शिवीगाळ केला होता. त्यानंतर वॉर्नच्या विरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला होता.

४. शाहरुख खानकडून वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षारक्षकाचा अपमान

२०१२ ला आयपीएलच्या ५ व्या मोसमाचे विजेतेपद मिळवल्यानंतर कोलकता नाईट रायडर्सचा सहसंघमालक शाहरुख खानने वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षारक्षकाचा अपमान केला होता. या घटनेनंतर शाहरुख खानला वानखेडे स्टेडियमवर येण्यास ४ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

५. कावेरी पाणीवाटप विवादा

आयपीएल २०१८ च्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जला त्यांचे चेन्नईतील एमए चिदम्बरम हे घरचे मैदान कावेरी पाणीवाटप विवादामुळे सोडावे लागले होते. चेन्नईने त्यांचा घरचा एकच सामना चेन्नईमध्ये खेळला. या पहिल्या सामन्यात प्रेक्षकांमधून बूट मैदानात भिरकावण्यात आला होता. त्यामुळं त्यानंतर चेन्नईचे सर्व घरचे सामने पुण्यात झाले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा