Advertisement

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना क्रिकेटचे मोफत धडे


महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना क्रिकेटचे मोफत धडे
SHARES

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता मोफत क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण शिबीर दीड महिन्यांसाठी असेल. नॅशनल क्रिकेट क्लब आणि रूट मोबाईल कंपनी यांच्या माध्यमातून महापालिकेने हे शिबीर आयोजित केले आहे.

ज्या मुलांना क्रिकेटची आवड आहे, पण आर्थिक स्थितीअभावी प्रशिक्षण घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असेल. दीड महिन्यांच्या शिबिरातून १४ वर्षांखीलील २० मुले आणि १६ वर्षांखालील २० मुले प्रशिक्षकांमार्फत निवडली जातील. त्यानंतर या दोन्ही वयोगटातील मिळून ४० मुलांना वर्षभर नॅशनल क्रिकेट क्‍लबच्या माध्यमातून मोफत क्रिकेट प्रशिक्षण दिले जाईल.

गल्लीबोळात खेळणाऱ्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेट खेळण्याचे टॅलेंट असते. परंतु आर्थिक क्षमता नसल्याने आणि क्रिकेटचे प्रशिक्षण न मिळाल्यामुळे ही मुले मागे राहतात. याच गोष्टीचा विचार करून नॅशनल क्रिकेट क्लब आणि रूट मोबाईल कंपनीतर्फे यावर्षी १ आॅक्टोबरपासून तीन दिवस खेळाडूंची निवड करण्यात येईल. त्यानंतर त्यांना १ वर्ष क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात येईल.

या शिबिरात निवड झालेल्या ४० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन बीसीसीआयच्या इनडोअर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याची संघी दिली जाईल. नॅशनल क्रिकेट क्लबचे कोच प्रसाद मांजरेकर, शेखर भोर तसेच इतर अनुभवी प्रशिक्षकांमार्फत खेळाडूंची निवड करण्यात येईल. चर्चगेट येथील क्रॉस मैदानावर या मुलांना क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येईल. शासनानेही या उपक्रमाला प्रोत्‍साहन दिले आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा