गौतम गंभीर 'या' संघाचा समभाग खरेदी करण्याची शक्यता

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि इंडियन प्रमियर लीग(आयपीएल)मध्ये दिल्ली व कोलकाता संघाचं नेतृत्व केलेला खेळाडू गौतम गंभीर नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

SHARE

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि इंडियन प्रमियर लीग(आयपीएल)मध्ये दिल्ली व कोलकाता संघाचं नेतृत्व केलेला खेळाडू गौतम गंभीर नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात गौतम गंभीरनं दिल्ली कॅपिटल्स संघाचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची तयारी दाखवल्याची माहिती समोर आहे.

१० टक्के समभाग

गौतम गंभीर लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून नवी दिल्लीतून निवडून आला आहे. त्यामुळं खेळाडूनंतर गौतमीची खासदार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. GMR उद्योग समुहाकडं सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाचे ५० टक्के सहभाग आहेत. गौतम गंभीरची सध्या १० टक्के समभाग खरेदी करण्याबद्दल GMR उद्योग समुहाशी चर्चा सुरु असून, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या संमतीनंतर याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतं.

१०० कोटी

१० टक्के समभाग खरेदी करण्यासाठी गौतम गंभीरला अंदाजे १०० कोटी रुपयांच्या घरात किंमत मोजावी लागणार आहे. गेल्या हंगामात दिल्लीच्या संघात अनेक बदल करण्यात आले होते. नवीन जिंदाल यांच्या JSW उद्योग समुहानं ५५० कोटी रुपये मोजत दिल्ली संघाची सह-मालकी आपल्याकडं घेतली. त्यानंतर 'दिल्ली डेअरडेविल्स'वरुन संघाचं नाव 'दिल्ली कॅपिटल्स' असं करण्यात आलं.

नव्या भूमिकेत

आयपीएलच्या १२व्या हंगामात दिल्लीच्या संघानं आश्वासक कामगिरी केली. गौतम गंभीरनं याआधी आयपीएलमध्ये दिल्ली आणि कोलकाता संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आपल्या नेतृत्वाखाली गौतमनं कोलकात्याला विजेतेपद मिळवून दिलं असलं तरीही दिल्लीकडून त्याची कारकिर्द फारशी चांगली राहिलेली नाही. त्यामुळं गव्हर्निंग काऊन्सिलची मान्यता मिळाल्यास गौतम गंभीर लवकरच नवीन भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.हेही वाचा -

मुंबईसाठी ‘व्हिजन २०३०’चं लक्ष्य, मुख्यमंत्र्यांनी दिली महापालिकेला भेट

म्हाडा कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभसंबंधित विषय
ताज्या बातम्या