Advertisement

मुंबईसाठी ‘व्हिजन २०३०’चं लक्ष्य, मुख्यमंत्र्यांनी दिली महापालिकेला भेट

मुंबईला झोपडपट्टी तसंच खड्डेमुक्त करून शहरातील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा, परवडणारी घरे देण्यासाठी ‘व्हिजन २०३०’ चं लक्ष्य आखण्याची सूचना मुख्यमंत्री ​उद्धव ठाकरे​​​ यांनी केली.

मुंबईसाठी ‘व्हिजन २०३०’चं लक्ष्य, मुख्यमंत्र्यांनी दिली महापालिकेला भेट
SHARES

मुंबईला झोपडपट्टी तसंच खड्डेमुक्त करून शहरातील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा, परवडणारी घरे देण्यासाठी ‘व्हिजन २०३०’ चं लक्ष्य आखण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर गुरूवारी उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुंबई महापालिका मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध समस्येसंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांची ३ तास बैठक घेतली.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या विविध कामांचा आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने झोपडपट्टीच्या वाढत्या प्रश्नावर त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. झोपडपट्ट्यांची संख्या वाढत असल्याने त्यांचा पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यांची संख्या नियंत्रणात ठेवून शहरात परवडणारी घर बांधण्याचाही महापालिकेने विचार सुरू केला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

हेही वाचा- नवीन प्रकल्पांना स्थगिती, नगरविकास विभागाचे आदेश

महापालिकेची ‘खड्डे दाखवा आणि पाचशे रुपये मिळवा’, ही योजना चांगली असली, तरी रस्त्यांचा दर्जा चांगला रहावा यासाठी कंत्राटदाराकडून १० वर्षांचा हमी कालावधी निश्चित करून घ्यावा, असं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी गारगाई आणि पिंजाळ प्रकल्पातील अडचणी दूर करून २०३० पर्यंत मुबलक पाणीपुरवठ्याचं लक्ष्य त्यांनी अधिकाऱ्यांसमोर ठेवलं आहे. 

तसंच मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरात वॅक्स म्युझियम, आधुनिक मत्सालय, नॅशनल पार्कमध्ये नाईट सफारीबाबतही चर्चा करण्यात आली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा