Advertisement

हार्दिक-लोकशने पकडले कान!

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि लोकश राहुल यांनी सोमवारी बिनशर्त माफी मागितली आहे.

हार्दिक-लोकशने पकडले कान!
SHARES

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि लोकश राहुल यांनी सोमवारी बिनशर्त माफी मागितली आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह विधानानंतर भारतीय क्रिकेट संघातून त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. याशिवाय दोघांनाही 'कारणे दाखवा' नोटीसही बजावण्यात आली होती. या नोटिसीला उत्तर देताना दोघांनीही घडलेल्या प्रकाराबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे.


लोकपाल नेमून चौकशी करावी

हार्दिक आणि राहुल यांनी जरी माफी मागितली असली, तरी त्यांचं वर्तन योग्य नसल्याचं मत बीसीसीआयच्या १० सदस्य संघटनांनी व्यक्त केलं आहे. या प्रकरणाची लोकपाल नेमून चौकशी करण्यात यावी, तसंच चौकशीसाठी विशेष सर्वसाधारण सभाही बोलावण्यात यावी, अशा प्रकराची मागणी या संघटनांनी केली आहे.


सुधारण्याची संधी द्यायला हवी

प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी हार्दिक आणि राहुल यांची बाजू घेत दोन्ही खेळाडूंना सुधारण्याची संधी द्यायला हवी असं म्हटलं आहे. त्याचं करिअर संपुष्टात येईल, असं कोणतंही पाऊल उचलण्यात येऊ नये, असंही त्यांनी नमूद केलं आहे.



हेही वाचा- 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच निधन

श्रद्धाने केलं ‘बाहुबली’चं तोंड गोड!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा