Advertisement

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच निधन

काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या महिन्याभरापासून किडनीच्या आजारामुळे मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच निधन
SHARES

काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या महिन्याभरापासून किडनीच्या आजारामुळे मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान मंगळवारी सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे पार्थिवावर अंत्यसंसकार केले जाणार आहे.


शिवाजीराव देशमुख यांचा अल्पपरिचय

काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचा जन्म १ सप्टेंबर १९३५ रोजी सांगली जिल्ह्यात झाला होता. १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० मध्ये राज्यात आमदार म्हणून त्यांची निवड झाली होती. १९९६ आणि २००२ मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. राज्याच्या विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून येण्याची हॅटट्रिक देशमुख यांनी केली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा