Advertisement

भारत-पाकिस्तान सामन्यासाठीच्या एका तिकिटाची किंमत माहितीये का? जाणून व्हाल थक्क!

येत्या १७ ऑक्टोबरपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं आयोजन यूएईत करण्यात आलं आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यासाठीच्या एका तिकिटाची किंमत माहितीये का? जाणून व्हाल थक्क!
SHARES

येत्या १७ ऑक्टोबरपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं आयोजन यूएईत करण्यात आलं आहे. त्यामुळं यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप कोण जिकणार यावर क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. त्यात या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारत व पाकिस्तान संघ एकमेंकांविरोधात खेळणार आहे. त्यांच्या समाना पाहण्यासाठी चाहते फारच उत्सूक असल्याचं पाहायला मिळत आहे. आयसीसीने ३ ऑक्टोबरपासून तिकिटांची विक्री सुरु केली आहे. सर्वात स्वस्त तिकीट दर हा ६०० रुपये इतका आहे. मात्र भारत विरूद्ध पाकिस्तान या हायवोल्टेज सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी एका तिकिटासाठी लाखो रुपये मोजत आहेत. तिकीट ३३३ टक्के अधिक महाग विकलं जात आहे.

क्रिकेटप्रेमी https://www.t20worldcup.com/tickets या संकेतस्थळावर जाऊन तिकीट खरेदी करू शकतात. या सामन्यासाठी सर्वात महाग तिकिटाचा दर हा २ लाख रुपये इतका आहे. टी २० विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. २४ ऑक्टोबरला दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे.

या सामन्यासाठी सर्वात महाग तिकिटाचा दर हा २ लाख रुपये इतका आहे. सामान्य तिकिटापेक्षा ३३३ टक्के अधिक किमत आहे. वेगवेगळ्या स्टँडसाठी वेगवेगळी किमत आहे. तिकिटाची सुरुवात १२,५०० पासून आहे. या व्यतिरिक्त ३१,२०० आणि ५४,१०० रुपयात क्रिकेटप्रेमी प्रीमियम आणि प्लॅटिनम स्टँडचं तिकीट खरेदी करू शकतात.

या तिन्ही कॅटेगरीचे तिकिटं जवळपास संपली आहेत. स्काय बॉक्स आणि वीआयपी स्वीटच्या किमती अधिकृत वेबसाईटवर दिसत नाहीत. मात्र भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या ३१ ऑक्टोबरच्या सामन्यासाठी वीआयपी स्वीटची किमत १ लाख ९६ हजार रुपये आहे. हा दर पाहता भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट दर महाग असण्याची शक्यता आहे. कारण भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी सर्वात कमी दर असलेलं तिकीट १०,४०० रुपये आहे.

यूएईत होणाऱ्या या स्पर्धेकरिता स्टेडियमवर ७० टक्के प्रेक्षकक्षमतेला परवानगी देण्यात आली आहे. आयसीसीनंही तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू केली आहे आणि भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटं तासाभरात विकली गेली आहेत.

भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर.

पाकिस्तान संघ - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा