भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर ५ ट्वेन्टी-२० आणि ३ एकदिवसीय लढती खेळवण्यात येणार आहेत.
१२ मार्चपासून अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. जस्प्रीत बुमराहनं गेल्या काही काळात सातत्याने भारताच्या तिन्ही संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळं त्याच्यावरील भार हलका करण्यासाठी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी बुमराला विश्रांती दिली जाऊ शकते. शिवाय, ऋषभ पंतचे संघातील पुनरागमन निश्चित मानलं जात असून सूर्यकुमारलाही यंदा प्रथमच संजू सॅमसनच्या जागी संघात स्थान मिळू शकते, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.
टी-२० सामने