Advertisement

भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, कसोटी मालिका २-१ ने जिंकली

रिषभ पंत, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराच्या तडाखेदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला भूमीत पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.

भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, कसोटी मालिका २-१ ने जिंकली
SHARES

रिषभ पंत, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराच्या तडाखेदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला भूमीत पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या विजयासाह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे. विशेष म्हणजे ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर ऑस्ट्रेलियाने ३२ वर्षांपासून कोणत्याही संघविरोधात एकदाही पराभव पाहिला नव्हता.

सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ८ गड्यांनी विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीनं फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे कठीण आव्हान पार केले.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा