Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतानं कसोटी मालिका जिंकली

१९४७ सालापासून भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या भूमीमध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. परंतु, कोहली ब्रिगेडनं यजमानांना धुळ चारत मालिका जिंकली.

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतानं कसोटी मालिका जिंकली
SHARES

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं तब्बल ७२ वर्षांनी कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास रचला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी शेवटच्या दिवशी पावसामुळे अनिर्णित राहिली. त्यामुळे भारतीय संघानं २-१ अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे.      

                                              

चेतेश्वर पुजाराचा गौरव

सिडनी कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावात ६२२ धावांचं लक्ष्य दिलं होतं.  हे लक्ष्य गाठताना
सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांत गुंडाळून फॉलोऑन दिला. मात्र, पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ सुरू होऊ शकला नाही. तसंच, उपहारानंतर देखील पावसानं विश्रांती न घेतल्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी सामना अनिर्णित म्हणून जाहीर केला. त्यानंतर भारतानं चार सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. या कसोटीत चेतेश्वर पुजाराला सामनावीर आणि मालिकावीराच्या किताबानं गौरवण्यात आलं.


७२ वर्षांनी रचला इतिहास

१९४७ सालापासून भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या भूमीमध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. परंतु, कोहली ब्रिगेडनं यजमानांना धुळ चारत मालिका जिंकली. भारतानं या कसोटी मालिकेत ३१ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं पर्थ कसोटी जिंकून आपलं आव्हानं कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मेलबर्नची तिसरी कसोटी १४६ धावांनी जिंकून भारताने मालिकेत आघाडी घेतली.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा