Advertisement

टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या नावावर विक्रमांची नोंद

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यानं अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या नावावर विक्रमांची नोंद
SHARES

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं २२ धावांनी विजय मळवला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, या सामन्यादरम्यान भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यानं अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. रोहित शर्मा हा सर्वाधिक षटकार लगावणारा आणि २४०० धावांचा आकडा पार करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

सर्वाधिक शतकांची नोंद

रोहित शर्माच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सर्वाधिक शतकांची नोंद आहे. रोहितनं टी-२० मध्ये आतापर्यंत ४ शतके केली आहेत. रोहित नंतर वेस्ट इंडीज संघाचा ख्रिस गेल आणि न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रो प्रत्येकी ३-३ शतकांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत.

२४२२ धावा

या सामन्यात रोहित शर्मानं ६७ धावा केल्या असून, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील २४०० धावांचा आकडाही पार केला आहे. रोहितच्या नावे २४२२ धावा आहेत. रोहित शर्मानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहली ११२ धावांनी रोहितच्या मागे आहे.

एकूण ३२२ चौकार 

टी-२० सामन्यांमध्ये षटकार आणि चौकार लगावण्यातही रोहित सर्वात पुढे आहे. त्यानं आतापर्यंत १०७ षटकार आणि २१५ चौकार लगावले आहेत. त्यामुळं रोहितच्या नावे एकूण ३२२ चौकार आहेत. रोहित शर्मा स्ट्राइक रेटमध्येही अव्वल आहे. रोहितचा १३६.९१ स्ट्राइक रेट आहे. तसंच, स्ट्राइक रेटमध्ये न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्कुलम (१३६.९१) दुसऱ्या स्थानी आहे.

नव्या विक्रमाला गवसणी

टी-२० सामन्यात भारतीय संघानं वेस्ट इंडीजचा पराभन करत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारतानं या विजयासह २ वेळा टी-२० विश्वविजेतेपद जिंकलेल्या विंडीजला सलग सामन्यात सर्वाधिक वेळा पराभूत करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारतानं विंडीजला सलग ५ सामन्यात विंडीजला पराभूत केलं आहे. याआधी पाकिस्ताननं विंडीजला सलग ५ सामन्यात पराभूत केलं होतं. भारत आणि विंडीज यांच्यात एकूण १३ टी २० सामने झाले आहेत. त्यापैकी ७ सामने भारतानं जिंकले असून, त्यातील ५ सामने भारतानं सलग जिंकले आहेत.हेही वाचा -

कलम ३७० चा परिणाम शेअर बाजारावर, सेन्सेक्स, निफ्टी कोसळले

बिग बॉसमध्ये दोन अभिजीत आमनेसामनेRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा