Advertisement

बिग बॉसमध्ये दोन अभिजीत आमनेसामने

आठवडा सुरू झालं की छोट्या पडद्याच्या चाहत्यांना बिग बॉसच्या घरात काय घडणार याचे वेध लागतात. या आठवड्याची सुरुवात वादावादीनं होणार असून दोन अभिजीत आमनेसामने उभे ठाकल्याचं प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

बिग बॉसमध्ये दोन अभिजीत आमनेसामने
SHARES

आठवडा सुरू झालं की छोट्या पडद्याच्या चाहत्यांना बिग बॉसच्या घरात काय घडणार याचे वेध लागतात. या आठवड्याची सुरुवात वादावादीनं होणार असून दोन अभिजीत आमनेसामने उभे ठाकल्याचं प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खांब खांब हे कॅप्टनसी कार्य सुरू होणार आहे. या कार्यामध्ये सदस्यांना खांब पकडून त्याच्यावर त्यांच्या नावाचे स्टीकर चिकटवायचे आहेत. यावरूनच सदस्यांमध्ये वाद होणार आहेत. आरोह आणि शिवमध्ये देखील याच मुद्यावरून वाद रंगला आहे. या टास्कमध्ये बिग बॉस यांनी सगळ्या सदस्यांना घराचा कॅप्टन होण्याची संधी दिली आहे. त्यामुळं आता ही संधी कोणीच गमवू इच्छित नाही आणि कॅप्टन होण्यासाठी सगळेच सदस्य जीव तोडून प्रयत्न करणार हे निश्चित.

याचवेळेस टास्कमध्ये शिवानीनं अभिजीत बिचुकले यांनी धरलेल्या खांबाला तिचं नाव चिकटवलं. अभिजीत केळकर याचं नाव असलेले स्टीकर तो खांबाला चिकटवण्याआधीच अभिजीत बिचुकलेने त्याचं नाव असलेले स्टीकर अभिजीत केळकरनं पकडलेल्या खांबाला चिकटवले. या कार्याची हीना संचालिका आहे. अभिजीत केळकरचं म्हणणं होतं की, असं नाही होऊ शकत. त्यावर हीनानं सांगितलं की, मी आधीच सांगितलं होतं की ज्याच्या नावाचे स्टीकर मला खांबावर आधी दिसेल ते ग्राह्य पकडले जाईल. यावरून बिग बॉसच्या घरात वाद होणार आहे.

अभिजीत केळकरचं म्हणणं होतं की, स्टीकर लावणं हा टास्क नाही आहे. त्यावर बिचुकले म्हणाला की, स्टीकर लावणं हाच टास्क आहे. कारण काही वेळा पूर्वी शिवानीनेदेखील तेच केलं. त्यावर शिव म्हणाला की, जो प्रकार झाला कॅमेऱ्याला एकदा सांगून ठेव. आता बघूया कोण चूक कोण बरोबर? खांब आणि स्टीकरच्या या खेळात दोन अभिजीत मात्र आपसात भिडल्याचं पहायला मिळणार आहे. अभिजीत वर्सेस अभिजीतचा हा खेळ कोण जिंकतं ते पहायचं आहे.हेही वाचा -

Movie Review: लैंगिक धडे देत बोलायलाही शिकवणारा 'शफाखाना

तुमच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरला आहेत 'यांचे' आवाज
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा