Advertisement

तुमच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरला आहेत 'यांचे' आवाज

कार्टून्स दिसतात अफलातूनच. पण, या पोरा-टोरांना टीव्हीकडे खेचून आणतो तो त्यांचा अल्लड आवाज. छोटुकल्यांच्या दुनियेतल्या या आत्रंगी पात्रांना आवाज देण्याचं काम केलंय ते मात्र मोठ्या मंडळींनी. या लोकप्रिय आवाजांना आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत.

तुमच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरला आहेत 'यांचे' आवाज
SHARES

शिनचॅनचं ‘इतनी भी तारीफ मत करो’ हे लोकप्रिय वाक्य आणि निंजाचा ‘डिंग डिंग डिंग’ हा आवाज कानावर पडला, की सगळ्या बच्चे कंपनीच्या टीव्हीवर उड्या पडतात. ही कार्टून्स दिसतात अफलातूनच. पण, या पोरा-टोरांना टीव्हीकडे खेचून आणतो तो त्यांचा अल्लड आवाज.. छोटुकल्यांच्या दुनियेतल्या या आत्रंगी पात्रांना आवाज देण्याचं काम केलंय ते मात्र मोठ्या मंडळींनी. सतत कार्टूनमागे असलेल्या या लोकप्रिय आवाजांना आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत.

) शिनचॅन

कार्टून विश्वातलं सगळ्यात आगाऊ कार्टून म्हणून शिनचॅनची ओळख जगभर आहेच. मस्तीखोर शिनचॅन प्रत्येक लहान मुलामध्ये दडलेला आहे. या खोडकर शिनचॅनच्यामागे आवाज आहे २८ वर्षीय अलका शर्माचा


अलकानं व्हॉइस ओव्हरचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. शिनचॅनसाठी आधी ती भाषांतरकार म्हणून काम करत होती. उत्सुकता म्हणून व्हॉइस ओव्हरचं काम कसं चालतं हे ती बघायची. त्यानंतर सहज म्हणून दिलेल्या ऑडिशनमध्ये तिची निवड झाली.

) निंजा हातोडी

हातात छोटीशी तलवार घेऊन निळ्या रंगाचे कपडे घालून घराबाहेर पडणाऱ्या निंजाने लहान मुलांच्या मनात घर केलंय. ‘डिंग डिंग डिंग’ असं म्हणत शत्रूंशी लढणाऱ्या निंजाच्या मागे आवाज आहे मेघना एरंडेचा.

मेघनाला आतापर्यंत प्रेक्षकांनी अनेक मालिका आणि सिनेमांतून बघितलंय. ती गेली २३ वर्षं डबिंग करतेय. तिने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर गंमत म्हणून डबिंग करायला लागली. पण नंतर ती तिची पॅशनच बनली. तिने आतापर्यंत अनेक कार्टून्सला आवाज दिलाय पण, निंजा तिच्यासाठी टर्निंग पाँइंट ठरला.

) डोरेमॉन

डोरेमॉन हे एक एलिअन मांजर आहे. आणि या क्युट मांजराला आवाज दिलाय २१ वर्षांच्या सोनल कौशलने. गेल्या ७-८ वर्षांपासून ती डोरेमॉनला आवाज देतेय. गंमत म्हणून दिलेल्या ऑडिशनमध्ये निवड झाली. -६ वर्षांची होती तेव्हापासून ऑल इंडिया रेडिओवर ती नाटक करायची.


) छोटा भीम

लाडू खाल्ला की त्याला शक्ती येते. मग तो लढायला सज्ज होतो. त्याला छोटा भीम म्हणतात. या ताकदवान भीमचा ताकदवान आवाज आहे, कौस्तुव घोषचा. व्हॉइस डायरेक्टर अमरकांत दुबे यासाठी त्याला मार्गदर्शन करतात.


आवाज देताना काय बदल केला पाहिजे याचं शिक्षण ते देतात. छोटा भीम हिंदी खूप चांगलं बोलतो. त्यामुळे त्याला हिंदीचा दांडगा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी तो हिंदी पुस्तकं वाचतो.

) ऑगी अॅण्ड द कॉकरोच

बॉलिवूड कलाकारांच्या आवाजाने नटलेलं हे कार्टून सध्या आघाडीवर आहे. या कार्टूनमधील जवळपास सर्वच पात्रांना सौरव चक्रवर्ती एकट्यानं आवाज देतात. सौरव एक स्टँडअप कॉमेडिअन आहे. याशिवाय त्यानं अनेक कार्टून्सनला आपला आवाज दिला आहे.  



हेही वाचा

पुरू बेर्डेंचा कुंचला म्हणतोय, 'बोल राजा बोल'

शिवानी मारणार 'अल्टी पल्टी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा