Advertisement

कलम ३७० चा परिणाम शेअर बाजारावर, सेन्सेक्स, निफ्टी कोसळले

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं ३७० कलम हटवण्याच्या निर्णयाचा परिणाम सोमवारी देशातील शेअर बाजारावर दिसून आला.

कलम ३७० चा परिणाम शेअर बाजारावर, सेन्सेक्स, निफ्टी कोसळले
SHARES

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं ३७० कलम हटवण्याच्या निर्णयाचा परिणाम सोमवारी देशातील शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स ४१८ अंकांनी घसरून ३६ हजार ६९९.८४ वर बंद झाला. तर निफ्टीनेही १३४ अंकांची मोठी घसरण नोंदवली. सोमवारी सकाळी सेन्सेक्स, निफ्टीची सुरूवात घसरणीनेच झाली. सेन्सेक्स २७६ ने घसरूनच उघडला. 


७०१ अंकांपर्यंत कोसळला

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० व ३५ अ हटविण्याबरोबरच या राज्याचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. त्यानंतर सेन्सेक्स, निफ्टीची घसरण वाढली. सेन्सेक्स ७०१ अंकांपर्यंत कोसळून ३६ हजार ४१६ वर आला. तर निफ्टीनेही २१५ अंकांची घट नोंदवली. त्यानंतर सेन्सेक्स, निफ्टी सावरले. मात्र दिवसाअखेरीस मोठ्या अंकांची घट नोंदवत सेन्सेक्स, निफ्टी बंद झाले. 


२८ शेअर्स घसरले

वाहन उद्योगातील मंदी आणि अमेरिका - चीनमधील व्यापार युद्धाचा परिणामही शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्समधील ३० पैकी २८ आणि निफ्टीतील ५० पैकी ४८ शेअर्स घसरले. इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स, टाटा, मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, वेदांता आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. 



हेही वाचा  -

शेअर बाजाराविषयी अनाठायी भीती

शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा