Advertisement

विराट कोहलीचा कान तुटला!


विराट कोहलीचा कान तुटला!
SHARES

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मादाम तुसाँमधील मेणाच्या पुतळ्याचे अनावरण होऊन दोन दोन दिवस उलटत नाही तोच या मेणाच्या पुतळ्याचं नुकसान झालं अाहे. कोहलीच्या या मेणाच्या पुतळ्याचा कान तुटला अाहे.


चाहत्यांमुळे नुकसान

नवी दिल्लीतील मादाम तुसाँमध्ये उभा करण्यात अालेला विराट कोहलीचा हा पुतळा चाहत्यांच्या अाकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला अाहे. या पुतळ्याशेजारी येऊन फोटो, सेल्फी काढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात अाहे. फोटो काढतानाच या पुतळ्याचं किरकोळ नुकसान झालं अाहे, असं मादाम तुसाँमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.


पुतळ्याची डागडुजी सुरू

पुतळ्याचं नुकसान झाल्याचं अधिकाऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर हा पुतळा डागडुजीसाठी पाठवण्यात अाला अाहे. लवकरत हा पुतळा पुन्हा मादाम तुसाँमध्ये मोठ्या दिमाखात उभा राहील, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.


काही कारणास्तव कोहलीच्या पुतळ्याचा कान तुटला होता. अाम्ही तात्काळ हा पुतळा डागडुजीसाठी पाठवला. अाता लवकरच पुन्हा एकदा हा पुतळ्या चाहत्यांच्या भेटीसाठी दाखल होईल. भारतीय संघाच्या कर्णधारासह फोटो काढण्यासाठी पुन्हा एकदा पुतळ्याला भेट द्या, यासाठी अाम्ही चाहत्यांना अामंत्रित करत अाहोत.
- मादाम तुसाँचे अधिकारी


हेही वाचा -

मादाम तुसाँमध्ये अवतरला विराट कोहलीचा मेणाचा पुतळा

विराटच्या मानेत लचक, बीसीसीआयचा खुलासा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा