Advertisement

धोनीची टिम इंडियात रि एण्ट्री, BCCI ने घातली एकच अट!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)च्या निवड समितीने (selection committee) धोनीसाठी पुन्हा एकदा टिम इंडियाचे (team india) दरवाजे खुले केले आहेत.

धोनीची टिम इंडियात रि एण्ट्री, BCCI ने घातली एकच अट!
SHARES

टिम इंडियाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेेंद्रसिंग धोनीच्या (M S Dhoni) चाहत्यांसाठी खूशखबर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)च्या निवड समितीने (selection committee) धोनीसाठी पुन्हा एकदा टिम इंडियाचे (team india) दरवाजे खुले केले आहेत. मात्र त्यासाठी केवळ एकच अट घातली आहे. ही अट पूर्ण केल्यास धोनी टिम इंडियात धडाकेबाज रि एण्ट्री घेऊ शकतो. 

इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्डकपपासून ते आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी (M S Dhoni) एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. धोनी तब्बल ८ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून (international cricket) दूर आहे. या दरम्यान वेस्ट इंडिज, साऊथ आफ्रिका, बांगलादेश, आॅस्ट्रेलिया, न्यूझिलंड, अशा संघांविरोधात भारताने सिरिज खेळल्या. पण महेंद्रसिंग धोनी या संघाचा भाग नव्हता. 

बीसीसीआयने (BCCI) त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची निवड केली असली, तरी चमकदार कामगिरी करण्यात तो सातत्याने अपयशी ठरतो आहे. त्यामुळे के.एल.राहुलला (k l rahul) पार्ट टाइम यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा धोनीवर खिळल्या आहेत. कारण लवकरच आयपीएलला (IPL) सुरूवात होणार आहे.

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यास त्याच्यासाठी पुन्हा एकदा संघाचे दरवाजे खुले होऊ शकतील, अशी निवड समितीने त्याच्यापुढे अट घातली आहे. आयपीएलनंतर टी २० वर्ल्डकप (T 20 world cup) सुरू होणार असल्याने धोनीला देखील वर्ल्डकपमध्ये खेळण्याची नक्कीच आशा लागलेली असेल.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा