Advertisement

लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी रोहितचं पत्नीला अनोखं गिफ्ट, रितिकाच्या डोळ्यांत दाटले अश्रू


लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी रोहितचं पत्नीला अनोखं गिफ्ट, रितिकाच्या डोळ्यांत दाटले अश्रू
SHARES

भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा अाणि 'मुंबईची मुलगी' रितिका साजदे यांनी दोन वर्षांपूर्वी अापल्या संसाराला सुरुवात केली. अाज त्यांच्या या सुखी संसाराला दोन वर्ष झाली. रोहितनंही अापल्या पत्नीला लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट देत एकदिवसीय क्रिकेटमधलं तिसरं द्विशतक साजरं केलं. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला अाहे.


'अाज कुछ तूफानी करते है'

धरमशाला इथं झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली होती. त्यामुळे सव्वाशे कोटी भारतीयांची निराशा झाली होती. अाज लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करतानाच 'अाज कुछ तूफानी करते है' या इराद्यानं रोहित चंडीगढच्या अायएस. बिंद्रा स्टेडियमवर उरतला. त्यानंतर चौकार-षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडत त्यानं खोऱ्यानं धावा कुटल्या अाणि तिसऱ्यांदा द्विशतकाला गवसणी घातली.



चुंबन देत व्यक्त केलं प्रेम

भारतात होणाऱ्या प्रत्येक सामन्याला रोहितला चिअर-अप करण्यासाठी रितिका नेहमीच स्टेडियममध्ये उपस्थित असते. अाज अापल्या अायुष्यातील खास दिवस असल्यामुळे ती नेहमीप्रमाणे अायएस. बिंद्रा स्टेडियमवर उपस्थित होती. रोहितनंही अापल्या या लव्हेबल पत्नीला नाराज न करता वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट दिलं. त्यानंतर रितिकाच्या डोळ्यांत अश्रू दाटून अाले. रोहितनंही द्विशतकानंतर हेल्मेट वर करत बोटांनी चुंबन घेत अापलं प्रेम व्यक्त केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा