वनडेत २५-२५ षटकांचे २ डाव करा, सचिनचा आयसीसीला सल्ला


SHARE

'वन-डेमध्ये एकच डाव ५० षटकांचा आहे, त्याऐवजी दोन डाव प्रत्येकी २५-२५ षटकांचे असावेत', असं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलं आहे. बदलत्या काळानुसार, प्रेक्षकांचं हित आणि महसुलाच्या दृष्टीनं क्रिकेटमध्ये नवनवीन गोष्टी अवलंबल्यानं खेळ आणखी समृद्ध होईल, असा सल्ला सचिननं आयसीसीला सुचवला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिन तेंडुलकरनं हे वक्तव्य केलं आहे.

वन-डे क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये एका मोठ्या बदलाची गरज सांगताना सचिननं वन-डेमध्ये एकच डाव ५० षटकांचा आहे, त्याऐवजी दोन डाव प्रत्येकी २५-२५ षटकांचे असावेत आणि या डावांमध्ये १५ मिनिटांची विश्रांती असावी, जेणेकरुन वन डेमध्ये चार डाव खेळले जातील, असं सूचवलं. या मुलाखतीत सचिननं 'संघ अ आणि संघ ब यांच्यात ५० षटकांचा सामना आहे. अ संघानं नाणेफेक जिंकली आणि २५ षटके फलंदाजी केली. आता ब संघाला त्यांचा डाव खेळण्याची संधी मिळेल.

‘या’ दिवशी भारतीय संघ खेळणार पहिला दिवस-रात्र कसोटी सामना

यानंतर संघ अ २६ व्या षटकापासून पुढे त्यांच्या उरलेल्या विकेट्ससह डाव पुढे नेईल. अशा पद्धतीनं संघ ब ला त्यांच्या दुसऱ्या डावात दिलेलं आव्हान पेलण्यासाठी मैदानात यावं लागेल. जर संघ अ पहिल्याच डावात सर्वबाद झाला, तर संघ ब ला आव्हानाचा सामना करण्यासाठी २५ षटकांचे दोन डाव असतील, ज्यात विश्रांतीही मिळेल. अशा विविध संकल्पना आहेत, ज्यावर काम करण्याची गरज आहे’, असं म्हटलं.

वन-डे क्रिकेटमध्ये नवे बदल केल्यास अनेक आव्हानांना सामोरं जाणं शक्य होईल. मैदानावरील धुकं किंवा दव हे गोलंदाजी करणाऱ्या संघाची चिंता वाढवणारं असतं. पण नव्या बदलांमुळं बॅकफूटवर गेलेल्या टीमला कमबॅक करण्याची आणखी एक संधी मिळेल. सध्याच्या नियमानुसार, मैदानावर दव असेल आणि एका संघानं नाणेफेक जिंकली, तर अशा पद्धतीत गोलंदाजी करणाऱ्या संघाकडं कोणताही पर्याय नसतो. चेंडू ओला होतो, ज्यामुळं गोलंदाजाला अडचणीचा सामना करावा लागतो, जे न्यायपूर्ण नाही’, असंही सचिननं म्हटलं आहे.

'बीसीसीआय'नं डे-नाईट कसोटीसाठी मागवले ७२ गुलाबी चेंडू

'२५ षटकांचे २ डाव असतील आणि पावसाची शक्यता असेल, तर दोन्ही संघांना वेगळी रणनिती बनवता येऊ शकते. प्रामाणिकपणे सांगायचं तर आमच्यापैकी कुणालाही डकवर्थ लुईस नियम समजलेला नाही. मला वाटतं, फक्त त्या दोन जेंटलमॅनलाच हे समजत असेल. पावसामुळं रद्द झालेला विजय हजारे ट्रॉफीतील सामना पाहा. हा सामना पावसामुळं वाया गेला आणि मुंबईला मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. अनिर्णायक सामना कुणालाही आवडणार नसल्याचं' सचिननं म्हटलं.हेही वाचा -

शिवसेनेने ठरवलं तरच पर्यायी सरकार देता येईल- नवाब मलिक

पश्चिम रेल्वेवर धावणार महिलांसाठी विशेष सीसीटीव्हीयुक्त लोकलसंबंधित विषय
ताज्या बातम्या